दहिहांडा (शब्बीर खान) : आशिया क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात म्हणजेच फायनलमध्ये भारत विरूद्ध बांगलादेशच्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा सुरू असताना बोरगाव मंजु येथील सट्टा अड्ड्यावर स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एका कारसह सात लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बोरगाव मंजुतील रहिवासी कैलास सिताराम अग्रवाल याच्या निवासस्थानी भारत बांग्लादेश सामन्यावर मोठया प्रमाणात सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रणजितसिंह ठाकूर यांना मिळाली. त्यानंतर त्यांच्या पथकाने बोरगाव मंजु येथील कैलास अग्रवाल याच्या निवासस्थानी छापा टाकला. या ठिकाणी अकोल्यातील सिंधी कॅम्पमधील रहिवासी दिनेश घनशामदास पारवाणी, गीरीष विश्वनाथ गुप्ता रा. रणपीसे नगर जागृती विद्यालयाजवळ अकोला या तिघांना ताब्यात घेतले. या तीनही सट्टा माफीयांची कसुन चौकशी केली असता त्यांनी हा गौरखधंदा सिंधी कॅम्पमधील रहिवासी गीरीष गुरुबानी याच्या मालकीचा असल्याचे सांगीतले. पोलिसांना त्याचा शोध सुरु केला आहे.या सट्टा अड्डयावरुन पोलिसांनी एक स्वीफ्ट कार, दोन रिमोट, सेट अप बॉक्स, सहा मोबाईल व एक एलजी कंपनीचा टीव्ही असा एकून सात लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कैलास सिताराम अग्रवाल, दिनेश घनशामदास पारवाणी, गीरीष विश्वनाथ गुप्ता व मुख्य सुत्रधार गीरीष गुरुबानी या चार जनांविरुध्द बोरगाव मंजु पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रणजितसिंह ठाकूर, दिनकर बुंदे, गणेश पांडे, आशीष ठाकूर, अश्वीन शिरसाट, फीरोज खान, गीता अवचार व संजय निखाडे यांनी केली.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola