भांबेरी (योगेश नायकवाडे) : तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील अक्षय मनोहर शेळके यांनी नाफेडला विकलेल्या तुरीचे पैसे चुकीने दुसऱ्याच्या खात्यात गेले. त्यामुळे अक्षय मनोहर शेळके यांनी विकलेल्या तुरीचा चुकारा देण्यात यावा आणि चुक करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशा मागणीची तक्रार तेल्हारा तहसिलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.
भांबेरी येथील अक्षय मनोहर शेळकेयांनी १३ एप्रिल २०१८ रोजी 12 क्विंटल ५० किलो तूर नाफेड मध्ये विकली होती. विकलेल्या तुरीच्या पैशाची विचारणा तिन ते चारवेळा केली.पण नेहमी उडवा-उडवीचे उत्तर देण्यात आले.त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पैसे खात्यात टाकल्याची माहिती देण्यात आली,पैसे जमा न झाल्याचे निर्दशनास आले.
मार्केट मध्ये विचारणा करण्यात आली असता ५ जून रोजी दुसऱ्याच्या खात्यात पैसे टाकल्या गेले आणि माहिती २० सप्टेंबर रोजी मला देण्यात आल्याचा आरोपही सदर शेतकर्याने तक्रार अर्जात केला आहे.तरी माझे पैसे मला व्याजासह परत करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी अक्षय मनोहर शेळके यांनी तहसिलदारांना दिलेल्या तक्रार अर्जातून केली आहे.
तसेच शेतकऱ्याला अनेक संकटाला सामोरे जावे लागते आणि नाफेड चा पैसा ६-६ महिने मिळत नाही आणि त्यात पैसे दुसऱ्याच्या खात्यात टाकले जात आहे शासनाने यामध्ये गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.
अधिक वाचा : गाडेगाव शाखा तर्फे सुधाकर गणगणे यांच्या वाढदिवसानिमित्य वृक्षारोपण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola