तेल्हारा (योगेश नायकवाडे) : तेल्हारा तालुक्यातिल सर्व गावात घरकुलच्या “ड” यादीच्या सर्वेची एकच धूमाकुळ उडाली आहे. शासनाने सर्व पंचायत समिती मार्फत प्रगनक (ग्रामसेवक) आणि डाटा ऑपरेटर यांची नेमनूक करून प्रत्येक गावामध्ये सर्वेक्षण साठी पाठवण्यात आले.
तालुक्यामधील ६२ गावामध्ये ह्या सर्वेचे काम ५ सप्टेंबर पासून युद्धपातळीवर सुरु आहे, तर लोकांना ग्रामीण भागातील लोकांनमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे कि,शासनाचा ह्या सर्वेच्या मागचा उद्देश काय आहे. प्रत्येक गावामध्ये एक प्रगनक आणि एक ऑपरेटर “ड” यादीतील सर्व लाभार्थ्याच्या घरोघरी जाऊन जिओटॅग करून घराचे ३ फोटो घेऊन अपलोड करत आहेत आणि प्रगनका मार्फत लाभार्थ्याची सर्व माहिती फॉर्म मध्ये भरली जात आहे.
तसेच शासनाने ह्याची डेडलाईन 30 सप्टेंबर दिलेली आहे.तालुक्यामधील ६२ गावाचे काम डेडलाईन पूर्वी होईल की नाही ह्याची चिंता व्यक्त केली जात आहे. तरी शासनाच्या ह्या उपक्रमामध्ये शासनाला कोणते ध्येय साध्य करायचे की निवडणुकी पूर्वी शासनाचा देखावा आहे यावर जनतेचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : गाडेगाव शाखा तर्फे सुधाकर गणगणे यांच्या वाढदिवसानिमित्य वृक्षारोपण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola