नवी दिल्ली : देशातील पर्यटन क्षेत्राच्या विकासात मोलाचे योगदान देणा-या महाराष्ट्रातील दोन हॉटेल आणि एका संस्थेला आज केंद्रीय पर्यटनमंत्री (स्वतंत्र प्रभार) के.जे.अल्फॉन्स यांच्या हस्ते राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी विज्ञान भवनात राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार 2016 -17 वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पर्यटन सचिव रश्मी वर्मा उपस्थित होत्या. देशात पर्यटन क्षेत्राच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या 77 हॉटेल्स व संस्थांना विविध श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबई येथील मेलुहा-द- फर्न आणि औरंगाबाद येथील ‘लेमन ट्री हॉटेल’ यांच्यासह मुंबई येथील ‘ग्रासरूट जर्नी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथील मेलुहा-द-फर्न या हे देशातील सर्वोत्तम पर्यावरणस्नेही हॉटेल ठरले आहे. पवई येथील हिरानंदानी गार्डन्स येथे स्थित या पंचातारांकित हॉटेलमध्ये अभ्यागत व पर्यटकांना उत्तम सुविधा पुरविण्यासोबतच पर्यावरणस्नेही वातावरण जपण्यात आले आहे.
औरगांबाद येथील लेमन ट्री हॉटेल देशातील सर्वोत्तम थ्री स्टार हॉटेल ठरले आहे. अजिंठा व वेरूळ लेण्यांना भेट देणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांसह चिखलठाणा, वाळुंज , चितगाव, शेंद्रा व पैठण या औद्योगिक क्षेत्रांना भेटी देणाऱ्या उद्योजकांची पहिली पसंती या हॉटेलला मिळाली आहे.
मुंबई येथील ग्रासरूट जर्नी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला देशातील सर्वोत्तम ग्रामीण कृषी पर्यटन प्रकल्पाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या संस्थेने ग्रामीण भागाशी नाळ जोडून ग्रामीण जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola