अकोला(प्रतिनिधी)- दि. 27 सप्टेंबर रोजी स्थानिक गोकुळ कॉलोनी येथे “महिला/विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना” ह्या विषयावर कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेच्या सुरवातीला उपस्थितांना सुरक्षे संदर्भात अकोला पोलिसांनी तयार केलेल्या विडिओ क्लिप्स दाखवण्यात आल्या त्या नंतर सिटी कोतवाली पोलीस स्टेशन व शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मा. विलास पाटील व महिला पो.कॉ.अश्विनी माने व महिला पो.कॉ. दिपाली नारनवरे ह्यांनी रहदारी नियमाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. दामिनी पथक तसेच SSB प्रमुख छाया वाघ मॅडम ह्यांनी दामिनी पथकाचे प्रत्यक्ष कामकाज व महिला सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. पो. कॉ. गोपाल मुकुंदे ह्यांनी सुरक्षे संदर्भात तर SWAS सदस्या डॉ. स्वप्नाताई लांडे ह्यांनी जादूटोणाविरोधी अधिनियम प्रात्यक्षिकसह स्पष्ट करून सांगितला. उपस्थितांना Ikola अँप चे महत्व व वापर, महत्वाचे हेल्पलाईन क्रमांक ह्यांची माहिती देऊन सूचना पत्रके वाटप करण्यात आली.
कार्यशाळेला स्थानिक आबालवृद्ध, महिला पो.कॉ. पद्मा बंड, SWAS सदस्या सौ.संध्याताई देशमुख तसेच पो.कॉ.विशाल मोरे ह्यांची उपस्थिती होती. कार्यशाळेचे आयोजन गोकुळ कॉलोनीवासी, ह्रिषिकेश नावकार व नगरसेवक श्री. आशिष पवित्रकार ह्यांनी केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रदीप अवचार ह्यांनी केले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola