नवी दिल्ली : शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ‘महिलांना मंदिर प्रवेश नाकारणं हे घटनाबाह्य असून प्रत्येक वयोगटातील महिलेला मंदिर प्रवेशाचा हक्क आहे. त्यांना लिंगभेदावरून प्रवेश नाकारता येणार नाही’, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे देशातील सर्वच मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करण्याचा महिलांचा मार्ग मोकळा झाला आहे.
शबरीमाला मंदिरात मासिक पाळी सुरू झालेल्या तरुणींना आणि महिलांना प्रवेश नाकारण्याबाबत यंग लॉयर्स असोसिएसननं दाखल केलेल्या जनहित याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश एम. खानविलकर, आर. एफ. नरीमन, डी. वाय. चंद्रचूड यांनी महिलांच्या बाजूने एकमताने निर्णय दिला तर न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांनी शबरीमाला मंदिराच्या बाजूने निर्णय दिला. ८०० वर्ष जुन्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रथा-परंपरेचं कारण देऊन प्रवेश नाकारला जात होता. न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे शबरीमालातील ८०० वर्षाची परंपरा आता मोडीत निघणार आहे. दरम्यान, याचिकाकर्त्यांनी या निर्णयासंदर्भात लवकरच कोर्टात पुनरावलोकन याचिका दाखल करण्यात येणार असल्याचं सांगितलं.
बंदी का घातली
बंदी का घातली?
केरळच्या पत्थनमथिट्टा जिल्ह्यात डोंगरावर शबरीमाला मंदिर आहे. या मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. मासिक पाळीच्या काळात पावित्र्यता जपली जात नाही. त्यामुळे महिलांना प्रवेश नाकारण्यात आल्याचं मंदिर प्रबंधन समितीने कोर्टात स्पष्ट केलं होतं.
केरळ सरकार महिलांच्या बाजूने
शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्यास आमचा पाठिंबा असल्याचं केरळ सरकारने ७ नोव्हेंबर २०१६ रोजी कोर्टात स्पष्ट केलं होतं. केरळमधील तत्कालीन एलडीएफ सरकारने महिलांची बाजू उचलून धरली होती. मात्र काँग्रेसचं सरकार येताच त्यांनी निर्णय बदलला होता.
अधिक वाचा : विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही: सर्वोच्च न्यायालय
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola