तेल्हारा(प्रतिनिधी)- स्थानिक डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे उदघाटन संपन्न झाले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सी.एन.राठोड होते. उदघाटक व प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. संतोष कांयदे, श्री शिवाजी महाविद्यालय अकोट हे उपस्थित होते. व्यासपीठावर राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ कृष्णा माहुरे, इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. धिरज नजान, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. डॉ. माहुरे यांनी केले.आपल्या प्रास्ताविकात त्यांनी अभ्यास मंडळाच्या स्थापनेची पाश्र्वभूमी विषद केलीे.प्रमुख वक्ते प्रा. डॉ. संतोष कांयदे यांनी आपल्या व्याख्यानात सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्ती संदर्भात असलेल्या काँलेजिअम पध्दतीबाबत अमूल्य असे मार्गदर्शन केले.काँलेजिअम पध्दतीबाबत वेळोवेळी न्यायालयानी दिलेल्या निर्णयांचा व संसदेने केलेल्या कायद्याचा संदर्भ देत काँलेजिअम पध्दत अतिशय सोप्या पद्धतीने समजून सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सी. एन. राठोड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व विषद केले.विद्यार्थ्यांनी राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास परीक्षेपुरता मर्यादित न ठेवता उत्तम नागरिक निर्माण करण्याकरिता करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा.पी. के.कुंडलवाड यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. रजनी बोबडे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष तराळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
अधिक वाचा : तेल्हारा शहरात भर चौकात केला विद्यार्थिनीचा विनयभंग
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola