अकोला – मा.भारत निवडणूक आयोगाने 01 जानेवार 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादयांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत दिनांक 01 सप्टेंबर 2018 ते दिनांक 31 ऑक्टोंबर 2018 पर्यंत पात्र असलेल्या मतदारांची / तरूणांची मतदार यादीमध्ये नांव नोंदणी करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने पात्र मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी दि. 29 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 वा. पर्यंत 30-अकोला पश्चिम या विधानसभा मतदार संघाच्या क्षेत्रामध्ये विशेष मोहिम जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येणार आहे.
भारतीय संविधानाने भारताचा मतदार होण्याचा बहुमुल्य अधिकार मतदाराला दिलेला आहे. सशक्त लोकशाही, बलशाली भारत होण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी या मोहीमेदरम्यान आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केली आहे.
सदयस्थितीत मतदार यादीमध्ये 18 ते 21 वर्षे वयोगटातील तरूणांचे मतदार म्हणून नोंदणीचे प्रमाण, त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेने फार कमी आहे. त्यामुळे हे प्रमाण वाढविणे हा एक प्रमुख उद्देश या विशेष मोहीमेचा आहे. त्याअनुषंगाने अकोला शहराच्या सर्व संबंधीत पात्र मतदारांना या मोहीमेचा जास्तीत जास्त लाभ व्हावा व कोणताही पात्र मतदार नोंदणी पासून वंचित राहू नये या हेतूने 30-अकोला पश्चिम या विधानसभा मतदार संघाच्या क्षेत्रामध्ये समाविष्ठ 283 मतदार यादी भागामधील क्षेत्रात दिनांक 29 सप्टेंबर 2018 या दिवशी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 पर्यंत संबंधीत मतदान केंद्रसतरीय अधिकारी हे अद्दयापही नविन नावची मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ न झालेल्या तरूण व पात्र मतदारांची नविन नावाची नोंदणी करण्यासाठी फॉर्म नं 06 घेवून घरोघरी जावून मतदार यादीमध्ये नांव समाविष्ठ करण्यासाठी येणार आहेत तसेच त्यांचे सोबत सदर कामावर प्रत्यक्ष नियंत्रण व तपासणी करीता महसूल विभागाचे अधिकारी / कर्मचारी सुध्दा सोबत राहणार आहेत. तरी 30-अकोला पश्चिम या मतदार संघातील सर्व नागरीकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व महसूल कर्मचारी यांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
या मोहिमेसाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 30-अकोला पश्चिम या विधानसभा मतदार संघाच्या क्षेत्रातील यादी भाग क्र. 1 ते 131 साठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, पथक प्रमुख म्हणून तहसिलदार विजय लोखंडे, भाग क्र. 132 ते 170 साठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, पथक प्रमुख म्हणून तहसिलदार रवि काळे, भाग क्र. 171 ते 210 साठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, पथक प्रमुख म्हणून तहसिलदार दिपक पुंडे, भाग क्र. 211 ते 250 साठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, पथक प्रमुख म्हणून तहसिलदार रामेश्वर पुरी, भाग क्र. 251 ते 283 साठी नियंत्रण अधिकारी अनिल खंडागळे, पथक प्रमुख म्हणून तहसिलदार राहूल तायडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola