अकोट(प्रतिनिधी): आज दिनांक २७ सप्टेंबर ला विविध मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय येथे निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने १) केशरी कार्ड धारकांना प्राधान्य गटात समाविष्ट करून त्यांना बीपीएल दराने धान्य मिळाले पाहिजे.यामध्ये बहुतांश भूमिहीन शेतकरी,मजूर त्याचा समाविष्ट आहे आणि शासनाचा जि.आरं. आहे त्यामुळे यांना धान्य मिळाले पाहिजे.तसेच गेल्या तीन महिन्यापासून अनेक गरीब कुटुंबांना धान्य मिळत नसल्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत. त्यांचा निर्णय आपण त्वरीत दयावा.
२)तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी अपंग व विधवा परितक्त्यात दुर्धर आजाराने पीडित लाभार्थी व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी यांना आज रोजी प्रति महिना ६०० रु सुरु आहे.परंतु ६०० रुपयात आजची महागाई पाहता काहीच करू शकत नाही .एकीकडे कुठलाही विभागाचा अधिकारी असो त्यांना किमान २०००० पासून ते लाख पर्यंत पगार आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी यांना किमान १५०० रुपये प्रति महिना मिळाला पाहिजे.
३) अकोट शहरातील अनेक गरिबांचे अर्धा गुंठा जागेचे गुंठेवारी प्रकरण आपल्याकडे प्रलंबित आहे .त्यामुळे त्या गरिबांच्या खरेदी थांबल्या आहेत . जरी आज ताबा राहणाऱ्याचा आहे. परंतु मालकी हक्क त्याच्याकडे नसल्यामुळे त्यांचे बाकीचे व्यवहार थांबले आहे.तरी आपण सर्व संबंधित अधिकारीशी बैठक बोलवून प्रकरण निकाली काढण्यात यावे . जर का आमच्या वरील विषयावर आपण जर लवकर घेतला नाही आम्ही शिवसेनेच्या बतीने भव्य शासनाचा निषेध मोर्चा अकोट येथे काढू. तसेच संबंधित मागण्या येत्या १५ दिवसांमध्ये निकाली न काढल्यास शिवसेने तर्फे आंदोलन छेडण्यात येईल असे सांगण्यात आले यावेळी प्रामुख्याने
दिलीप बोचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख ,सौ विजया दिलीप बोचे दक्षता समिती सदस्य तसेच नगरसेविका,श्याम गावंडे तालुका प्रमुख , सुनील रंधे शहर प्रमुख ,विक्रम जायले उपजिल्हासंघटक,मुकेश निचळ जिल्हा समनव्यक ,योगेश तराळे तालुका संघटक,साहेबराव भगत , रोशन पर्वतकार शहर संघटक,कार्तिक गावंडे,सुभाष सुरत्ने,विजय अंभोरे,गोपाल म्हैसने,अंबिर मोरे,धीरज गावंडे,जितू चंडालिया,गणेश चंडालिया,दीपक रेखाते, श्रीकांत कंबे,शिवा गोटे,बजरंग गोतमारे,दीपक नाठे, गोपाळ कावरे,जयपाल ठाकूर, प्रशांत येउल, अक्षय मोगरे,उमेश आवारे,ज्ञानेश्वर बोरोकर,बबलू नांदूरकर,पिंटू पालेकर,योगेश बरेठिया,विकास जैस्वाल,नितीन काकड,शिवशंकर ठाकरे,संतोष बुंदेले,अक्षय नाचणे,संतोष सरकटे,विलास तालोकर,शुभम गावंडे,सुरेश शेंडोकार,निलेश गौड,किशोर आवारे,देवा रंधे,आशिष नागपुरे,नंदू बेराड, प्रफुल बोरकुटे,संजय तायडे,शुभम येवले,विष्णू राऊत,प्रवीण मोरोडे,राजू भाऊ बहाकार,सुनील राझे,स्वप्नील मलिक,बिट्टू बुधलंकार,करन मोगरे,शुभम हाटेकर, नीरज गुणारे,कार्तिक खडेकर, सागर आसलकार,यश चावरे,अनुप माळवे,जय जवंजाळ,प्रेमकुमार झापे, गजानन कौलखेडे,नारायण अढाऊ,देवा केदार,अल्पलेश दुधे,ऋषी लोणकर,सोपान पोहरे,देवेश बघेले, अतुल नवत्रे व शेकडो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.