अकोट (प्रतिनिधी): तालुक्यातील मुडगांव येथील शेतकरी विलास बहादुरे यांनी त्याच्या शेतातील तुर शासनाच्या हमीभावाने योजने अंतर्गत विक्री करीता ऑनलाइन नोदंणी केली नतंर नोदणी नुसार ८मे २०१८ रोजी नाफेडला दिली माझा सोबत माझा भावाची तुर व मुडगांव गावातील इतर १७ शेतकरी यांनी सुद्धा नाफेडला रितसर अर्ज करुन मोजुन दिली परंतु अद्यापही आम्हाला तुरीचे पैसे मिळाले नाहीत माझा मुख्य व्यवसाय शेती असुन माझी परीस्थिती हलाख्यीचे आहे .सदर पैसे न मिळल्याने मला मानसिक शारीरिक व मला आर्थिक समस्येला तोड द्यावे लागत आहे तरी मला व माझा गावातील व तालुक्यातील शेतकऱ्याचे तुरीचे पैसे लवकर द्यावे अन्यथा अकोट तहसिल कार्यलयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.