नवी दिल्ली: विवाहबाह्य संबंधात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पुरुष आणि स्त्री दोन्ही समान आहेत. त्यामुळे विवाहबाह्य संबंधात पती हा पत्नीचा मालक होऊ शकत नाही, असं सांगतानाच विवाहबाह्य संबंध (व्याभिचार) हा गुन्हा नाही. हा अपराध होऊ शकत नाही, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. व्याभिचाराला गुन्हा ठरवणारं भारतीय दंड संहितेचं कलम ४९७ ही कोर्टाने अवैध ठरवलं आहे.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश एम. खानविलकर, आर. एफ. नरीमन, डी. वाय. चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा आदी पाच सदस्यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. जोसेफ शाइन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून विवाहबाह्य संबंधासंदर्भातील या कायद्याला आव्हान दिलं होतं. महिलांना असमानतेची वागणूक देणं हे असंविधानिक आहे. मी, तू आणि आम्ही हे लोकशाहीचं वैशिष्ट्ये आहे, असं दीपक मिश्रा यांनी सांगितलं. भारतीय दंड संहितेचं कलम ४९७ महिलेच्या सन्मानाच्या विरोधात आहे. महिलांचा नेहमीच सन्मान करायला हवा, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.
समाजाच्या इच्छेनुसार महिलांना विचार करण्यास सांगता येऊ शकत नाही. संसदेनेही महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कौटुंबीक हिंसाचाराविरोधी कायदा मंजूर केला आहे. त्यामुळे पती कधीही पत्नीचा मालक होऊ शकत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.
घटस्फोट होऊ शकतो
व्याभिचार हा गुन्हा नसला तरी विवाहबाह्य संबंधाच्या कारणाने स्त्री किंवा पुरुष दोघांनाही घटस्फोट घेता येऊ शकतो, असं मिश्रा यांनी स्पष्ट केलं.
स्त्रियांची मानहानी करणारा कायदा
हा कायदा मनमानी करणारा असल्याचं चंद्रचूड यांनी सांगितलं. हा कायदा स्त्रियांची मानहानी करणारा आहे. हा कायदा लैंगिक पसंती रोखणारा आहे. त्यामुळेच तो असंविधानिक आहे. लग्नानंतरही स्त्रियांना लैंगिक पसंतीपासून रोखता येणार नाही, असंही चंद्रचूड यांनी सांगितलं.
अधिक वाचा : काय आहे कलम 377 आणि अनैसर्गिक संभोग म्हणजे नेमके काय ?
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola