पातुर (सुनील गाडगे): स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सावित्रीबाई फुले प्राथ.माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय पातुरच्या वतीने स्वच्छता सप्ताहाचे आयोजन केले असून सप्ताहाच्या पहिल्या दिवशी “स्वच्छ भारत सुंदर भारत” या विषयावर निबंध स्पर्धा वर्ग ५ ते ७ अ गट व ८ ते १२ ब गट अश्या पद्धतीने आयोजन करुन स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविना-या विद्यार्थ्याना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली तर सप्ताहच्या दुस-या दिवशी चित्रकला स्पर्धा वरील प्रमाणे घेउन गट ५ ते ७ च्या विद्यार्थ्यानी “ शालेय परिसरातील स्वच्छता करताना मुले हया विषयावर चित्र काढले तर गट ८ ते १२ च्या विद्यार्थ्यानी गावातील स्वच्छता करतानी मानसे हया विषयावर चित्रे काढली. सप्ताहाच्या तीस-या दिवशी वरील प्रमाणे गटात “एक पाउल स्वच्छते कडे” हया विषयावर वकृत्व स्पर्धा आयोजित केली.सर्व स्पर्धे मधे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविना-या विद्यार्थ्याना संस्थेच्या वतीने प्रोत्साहन पर बक्षिस देण्यात आले. सप्ताहाच्या चौथ्या दिवशी वर्ग ८ ते १२ वी च्या मुला-मुलींनी गावातील मुख्य चौकात म्हणजे पोलिस स्टेशन चौक, जुने बसस्टैंड, नविन बसस्टैंड, संभाजी चौक, व चिरा चौक येथे स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी पथनाट्य सादर केली.
सदर सप्ताहाचा ५ वा ६ वा व ७ वा दिवस विशेष उल्लेखनीय ठरला असून सदर दिवसामधे शाळेतिल विद्यार्थ्यानी “एक पाउल स्वच्छते कडे” हया उपक्रमांतर्गत गावातील मुख्य रस्ते,गल्ली,बोळामधील सर्व कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावली त्याम्धे इयता १ ते ४ च्या विद्यार्थ्यानी बालापुर नाका राजाराम देवकर यांचे घरापासून महात्मा फुले नगर गाडगेवाडी ते झोपडपट्टी व तेथून बायपास रोड ते संभाजी चौक पासून शाळेपर्यंत सर्व रस्ते साफ़ करुण
कचरा–ची विल्हेवाट लावली वर्ग ५ ते ७ च्या विद्यार्थ्यानी बाळापुर वेस गुजरी लाईन भगत वेटाळ चिरा चौक मिलिंद नगर, सिदाजी दूध डेअरी, जवळून सिदाजी वेटाळ ते बाळापुर वेशी पर्यंत रस्त्याची साफ सफाई केली त्याच बरोबर वर्ग ८ ते १२ च्या विद्यार्थ्यानी जुने बसस्टैंड रोड ते पोलिस स्टेशन, आठवडी बाजार, सरकारी दवाखाना, गुरुवार पेठ, त्याच बरोबर सिदाजी नगर , रेणुका नगर मधे असलेल्या सर्व मुख्य रस्त्याची साफसफाई केली.
“एक पाउल स्वच्छते कडे” हया उपक्रमांतर्गत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत तब्बल २० ते २२ किलो मीटर च्या रस्त्यांची साफसफाई करुण गावापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.हया उपक्रमाच्या साठी झालेल्या खर्च जशे की कचरा नेण्यासाठी ट्रॅक्टर, पोस्टर, बॅनर्स,मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय हया सर्व गोष्टी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ.सपनाताई म्हैसने, सचिव श्री.सचिन ढोणे यांच्या सहकार्याने पूर्ण केले असून विशेष म्हणजे संस्थेच्या अध्यक्षा सौ.सपनाताई म्हैसने व सचिव श्री.सचिन ढोणे ह्यानी स्वत: गावातील रस्ते व गल्लीबोळा फीरून कचरा उचलला हे येथे उल्लेखनीय आहे.
सदर उपक्रमांतर्गत गावातील नागरिकांना शाळेतिल चिमुक्ल्या, विद्यार्थ्यानी,शिक्षकांनी स्वच्छतेचा संदेश दिला.सदर नागरिकांन कडून गाव , रस्ते स्वच्छ ठेवतिल एवढीच अपेक्षा ! उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतिल मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षके-तर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola