अकोला(शब्बीर खान): अकोला जिल्हा व महानगर वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असंघटीत कामगार म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंद करावी त्याकरिता शासन दरबारी जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत धरणे कार्यक्रम करुन निवेदन देण्यात आले. या संदर्भात वृत्तपत्र विक्रेत्यांनी असंघटीत कामगार म्हणून शासनाने नोंद करणे व कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करणे याकरिता राज्यभर आंदोलन केले होते. या प्रश्नाला घेवून पुन्हा 7-9-2018 रोजी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेतर्फे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आली. अशी माहिती वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे सुत्रांनी दिली.
यावेळी अकोला जिल्हा व महानगर वृत्तपत्र संघटनेतर्फे बहुसंख्य वृत्तपत्र विक्रेत्यांनी पेंडालमध्ये उपस्थिती दर्शवुन आपला सहभाग दर्शविला. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ, तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार परिषदेतर्फे या आंदोलनास जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला. अखिल भारतीय पत्रकार संघटनेतर्फे संघटनेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, शौकत अली मिर साहेब अकोला जिल्हाध्यक्ष, प्रमोद लाजुरकर, गजानन सोमाणी, कमलकिशोर शर्मा, नरेश टमटमकर तर महाराष्ट्र राज्य साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेतर्फे संस्थापक अध्यक्ष पी. टी. धांडे, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता नरेन्द्र व्ही. देशमुख, ज्ञानेश्वर निखाडे, भुषण कुटाफळे, महाराष्ट्र महिला अध्यक्षा सुनिताताई धुरंधर, महाराष्ट्र महिला सचिव राधिकाताई पाटील, विदर्भ अध्यक्ष शंकर कंकाळ, मिडीया असोसिएशन व्दारे पुरुषोत्तम ढोले, जिप मेटॅडोर टॅक्सी असोसिएशनचे अकोला शहर महानगर अध्यक्ष अरुण गुजर, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना अध्यक्ष गोपाल नारे, प्रकाश आमले, सचिन वानखडे, अकोला बिल्डींग पेन्टर्स, बांधकाम मजुर असो. चे शैलेष सुर्यवंशी, याशिवाय जवळपास सर्व दैनिक व साप्ताहिक तसेच इलेक्ट्रॉनिक मिडीया प्रतिनिधी यांनी यावेळी प्रत्यक्ष सहभाग दर्शविला होता.
जवळपास 13 वर्षापासून वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे ही मागणी रेटून धरण्यात आली आहे. तरी शासनातर्फे कोणत्याही यांच्या मागण्या अद्याप पर्यंत मंजुर करण्यात आलेल्या नाहीत. असंघटीत कामगार वृत्तपत्र संघटना यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करुन भरीव आर्थिक मदत द्यावी.
तसेच सामाजिक सुरक्षा मंडळात विशेष सल्लागार म्हणून विक्रेता संघाच्या मंडळाची निवड करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. गटाई कामगार प्रमाणे मोक्याच्या ठिकाणी स्टॉल देण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी आणि स्टॉलचे अतिक्रमण हटवु नये, शासनाच्या घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव कोटा ठेवावा आणि वृत्तपत्र विक्रेत्यांकरिता शासनानी पेन्शन लागु करावी अशा अनेक मागण्यांचा समावेश जिल्हाधिकारी अकोला यांना देण्यात आलेल्या निवेदनात होत्या. 15 सप्टेबर 2018 पर्यंत वृत्तपत्र विक्रेता असंघटीत कामगार म्हणून नोंदणी सुरु करावी असे यावेळी सांगण्यात आले.
वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे मुख्य मार्गदर्शन पांडूरंग धरमकर, विशेष सल्लागार ललित अग्रवाल, वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष संतोष तेलंग, उपाध्यक्ष दिपक अग्रवाल, सचिव प्रकाश आमले, याशिवाय अनेक गणमान्य व्यक्तींनी सहभाग घेतला होता.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola