पातूर(सुनील गाडगे)- शहरातील भीमनगर येथे बाप लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. प्राप्त माहितीनुसार भीमनगर येथील रहिवासी श्रीराम सुरवाडे (वय ७५ वर्षे) यांना दोन मुले व एक मुलगी अशी अपत्ये असून अरुण सुरवाडे हा मोठा मुलगा २३ सप्टेंबरच्या रात्री घरी आला. तुम्हाला जो निराधार भत्ता मिळतो त्यातील काही पैसे द्या, असे सांगून हुज्जत घालू लागला. काही वेळानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
मोठा मुलगा व सुनेने धक्का दिल्यामुळे श्रीराम सुरवाडे रस्त्यावर पडले. त्यांना जबर मार लागला. ते मुलाची तक्रार करण्याकरिता पोलिस स्टेशनला आले. तक्रार देऊन त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवले होते. परंतु त्यांना जास्त त्रास होत असल्यानेे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अकोला सर्वोपचार रुग्णालय येथे पाठवले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवार, २५ सप्टेंबरला त्यांचा मृत्यू झाला.
श्रीराम सुरवाडे यांच्या मुलीने दिलेल्या माहिती नुसार मृतकाचा मुलगा हा पैशासाठी वडिलांना त्रास देत असे. तो एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत असे अशी माहिती दिली असून पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास पातूर पोलिस करीत आहेत.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola