तेल्हारा (योगेश नायकवाडे ) : तेल्हारा तहसिल येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे आंदोलन जिल्हाध्यक्ष तुषारदादा पुंडकर यांच्या नेतुत्वात करण्यात आले व तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्या नुसार शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी शेत माल हमीभावात विकत घ्यावा या करिता नाफेड नावाची शेतमाल खरेदी योजना चालू केली पण “वरून कीर्तन आतून तमाशा” अशी झाली. उडीद,मुंग तयार होऊन आठवडा झाला पण खरेदी सुरु झालेली नाही.
ऑनलाइन विमा अजूनही शेतकऱ्याला मिळाला नाही.तसेच मागणीनुसार शासनाने विमा कंपनीचे तालुका स्तरावर ऑफीस उघडावे म्हणजे शेतकऱ्यांना न्याय मांगता येईल तसेच नियम व अटी माहिती होतील त्याचप्रमाणे शासनाने मुंग,उडीद नाफेड सुरु केली नाही ती सुरु करावी. अश्या बऱ्याच मागण्यांसाठी प्रहारने आंदोलन केले आहे.त्यावेळी उपस्थित जिल्हा प्रमुख तुषार दादा पुंडकर,तालुका प्रमुख मुकेश बिहाडे,युवा उपजिल्हा प्रमुख भैया खारोडे,तालुका अध्यक्ष प्रहार शेतकरी आघाडी अशोक नेमाडे,शहर अध्यक्ष मितेश मल्ल, उपाध्यक्ष प्रहार शेतकरी आघाडी सतिश शेळके, प्रा.रविंद्र ताथोड सरचिटणीस शेतकरी आघाडी, युवा अध्यक्ष प्रफुल दबडघाव, युवा उपाध्यक्ष साकिब पटेल, युवा शहर अध्यक्ष वैभव खाडे, युवा ता.कार्याध्यक्ष गणेश बावस्कार, प्रदिप पाथ्रीकर, शैलेश नायकवाडे, वैभव पाथ्रीकर असे बरेच प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रहारच्या निवेदुनानुसार मागण्या :-
१. नाफेड हि योजना खरीप व रब्बी माल तयार होण्याच्या ८ दिवस अगोदर सुरु करावी.(ऑनलाईन अर्ज करण्यासाठी),
२. मुंग, उडीदाचे मागील वर्षीचे चुकारे व्याजासह शेतकऱ्यांना ८ दिवसात द्यावे.
३.तूर व हरबर्याचे थकीत चुकारे सुद्धा व्याजासह शेतकऱ्यांना ८ दिवसात द्यावे.
४. हरबरा व तूर यांची १००० रु भावांतर योजना रक्कम ताबडतोड शेतकऱ्यांना देण्यात यावी.
५. पिकविमा कंपनीचे एजंट किव्हा शाखा हि तालुका स्तरावर ठेवावी.
६. ऑनलाईन पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोड देण्यात यावा.
७. बोंड अळीचे थकीत अनुदान ८ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.
८. भावांतर योजनाही खरीप व रब्बी दोन्ही पिकांना कायम स्वरूपी लागू करावी.
९. पीएम पीकविमायोजनेच्या कंपनीचे नाव,नियम,अटी,कंपनीचा पत्ता,ध्वनी क्रमांक देण्यात यावा.
पाहा : व्हिडिओ : बेलखेड येथिल पाणी पुरवठा त्वरीत चालु करावा नागरीकांची मागणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola