पुणे : २०१४ च्या दुष्काळानंतर यंदा सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारली आहे. परिणामी राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळसदृश स्थिती आहे. सप्टेंबरमधील पावसावर भिस्त असणाऱ्या मराठवाड्यावर कोरड्या सप्टेंबरमुळे दुष्काळाचे सावट आहे.
मराठवाड्यातील नांदेड वगळता इतर ७ जिल्ह्यांत पावसाची तूट लक्षणीय वाढली आहे. राज्यातील एकूण १५ जिल्ह्यांत पावसाअभावी स्थिती चिंताजनक आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) नैऋत्य मान्सून देशातून परतण्यास २९ सप्टेंबरपासून सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार, पश्चिम राजस्थानात मंगळवारपासून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तेथील आर्द्रता कमी होऊन जमिनीलगत वारे वाहण्यास अनुकूल स्थिती होत आहे. ही सर्व मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची लक्षणे आहेत. त्यामुळे २९ सप्टेंबरपासून मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : विदर्भात दाेन दिवस पावसाचा अंदाज; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola