अकोला (प्रतिनिधी):भारिप बहुजन महासंघ अकोला जिल्ह्याची महत्वपूर्ण आढावा बैठक आज जिल्हाध्यक्ष प्रदिपभाउ वानखडे यांच्या अध्यक्षतेखालीसंपन्न स्थानिक जि प. विश्रामगृह अकोला येथे संपन्न झाली. अकोला जिल्ह्यातील संपन्न झालेल्या विविध तालुका मेळाव्यांचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्याचप्रमाणे दिनांक २८ सप्टेंबर ला सोलापूर येथे श्रद्धेय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य उपस्थितत होणाऱ्या महावेळाव्या करिता अकोला जिल्ह्यातुन जास्तीत जास्त कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित रहावे याचे नियोजन करुन तशा सूचना जिल्हाध्यक्ष प्रदिपभाउ वानखडे यानी दिल्या. तसेच सोलापूरला जाण्याकरिता २६ व २७ सप्टेंबर ला पक्ष कार्यालय व रेल्वे स्टेशनवर बिल्ले सुद्धा वाटप करण्यात येतील. सदर बैठकीला प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष प्रदिपभाउ वानखडे , महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, दीपक गवई, सैफुल्ला खान जिल्हाप्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, संघटक बळीराम चिकटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ प्रसन्नजीत गवई, जिल्हा उपाध्यक्ष सर्वश्री राजेश ठाकरे, डॉ अशोक गाडगे, महादेवराव जाधव, गजानन दांडगे, विजय बोचरे, जिल्हा सचिव सर्वश्री गौतमराव शिरसाट, दिनकर नागे, संजय बावणे, अंबादास उगले, जिल्हा सदस्य सर्वश्री वासुदेव सुलताने, दिवाकर तिडके, दादाराव सुरडकर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी बैठकीचे संचालन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ प्रसन्नजीत गवई यांनी तर आभार जिल्हाध्यक्ष महासचिव ज्ञानेश्वर सुलताने यांनी मानले असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ प्रसन्नजीत गवई यांनी कळविले आहे.