परिस्थितीवर मात करत रिक्षाचालकाच्या मुलीने पोलंडमध्ये पार पडलेल्या बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. संदीप कौर ने केलेल्या कामगिरीमुळे आज तिच्या कुटुंबियांच्या लढ्याला ‘सुवर्ण’यश मिळालं आहे. संदीप कौरने पोलंड येथील १३ व्या आंतरराष्ट्रीय सिलेसियन बॉक्सिंग चॅम्पिअनशिपमध्ये ५२ किलो वजीन गटात सुवर्णपदक जिंकलं आहे. ज्युनिअर सेक्शनमध्ये ती खेळत होती. संदीप कौरने पोलंडच्या कॅरोलिनाचा 5-0 ने पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
पण हे यश १६ वर्षीय संदीप कौरला सहजासहजी मिळालेलं नाही. पटियालामधील हसनपूरची रहिवासी असणाऱ्या संदीप कौरला नेहमीच परिस्थितीशी झगडावं लागलं आहे. मग ती कुटुंबाची आर्थिक परिस्थिती असो किंवा खेळातून बाहेर पडावं यासाठी गावकऱ्यांनी कुटुंबावर टाकलेला दबाव असो…संदीप कौ रला नेहमीच अडचणींचा सामना करावा लागला.
संदीप कौर चे वडील सरदार जसवीर सिंह कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवतात. कुटुंबाला भुकेल्या पोटी झोपावं लागणार नाही किमान इतकी कमाई ते करतात. पण महत्त्वाचं म्हणजे संदीपला बॉक्सिंग सोडावी लागू नये याची त्यांनी विशेष काळजी घेतली.
संदीप कौर चे काका सिमरनजीत सिंह गावातील अकॅ़डमीत बॉक्सिंगचं प्रशिक्षण घेत असतं. संदीपला त्यांच्यापासूनच प्रेरणा मिळाली आहे. ‘मी लहान असताना काकांसोबत बॉक्सिंग अकॅडमीत जात असे. मी तिथे काही तरुणांना खेळताना पाहिलं आणि बॉक्सिंग शिकावं असं वाटू लागलं. मी आठ वर्षांचे होते जेव्हा पहिल्यांदा बॉक्सिंग ग्लोव्ह्स घातले आणि प्रशिक्षणाला सुरुवात केली’, असं संदीप कौरने सांगितलं आहे.
अधिक वाचा : रोहित-शिखरनं मोडला सचिन-सेहवागचा विक्रम
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola