पातूर (सुनील गाडगे) : दहा दिवस मनोभावे पूजा करून काल आपल्या बाप्पांना निरोप दिला. पातूर शहरातील व देऊळगाव परिसरातील भाविकांनी एमआयडीसी जवळ असलेल्या पाझर तलाव येथे बाप्पाचे विसर्जन केले. बाप्पांचे निर्माल्य तलावाच्या काठावर विसर्जित केले. विसर्जनाचा सोहळा उत्साहात पार पडला.
दुसऱ्या दिवशी या तलावावर गोपाल गाडगे व डिगांबर आयस्कार सहज फेरफटका मारायला गेले असता त्यांना तलावात प्लास्टिक च्या पिशव्यांनी व्यापून प्रदुषित झालेला दिसला. व निर्माल्य अस्ताव्यस्त पडलेले होते. या निसर्गवेड्या दोघांनी तलावातील प्लास्टिक गोळा केले. सुकलेला कचरा व प्लास्टिक पिशव्या जाळून तलाव स्वच्छ करण्याचे काम केले. अशा तरुणांचा आदर्श जर गणेशभक्तांनी घेतला तर प्रदूषण होणार नाही.
अजूनही काही तलावावर निर्माल्य व प्लास्टिक पिशव्यांचा कचरा असेल तर तो उचलून नष्ट करण्याची जबाबदारी प्रत्येक गणेश भक्तांची आहे.
अधिक वाचा : कावड यात्रेत मृत्यु पावलेल्या शिव भक्ताच्या विधवा पत्नीला तात्काळ राशनकार्ड चे वाटप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola