हातरुण (प्रतिनिधी): स्क्रब टायफस ने बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग खबळून जागा झाला असून, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून गावात सर्वेक्षण करण्यात आले. स्क्रब टायफस सदृश आजाराची लागण झालेल्या नुसरत परवीन जमीर अहेमद ४२ वर्षीय महिलेचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे स्क्रब टायफस या आजाराविषयी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. रविवारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या घरातील सदस्यांची वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम गिरी यांनी तपासणी केली.
या पथकाकडून ताप आणि किटक सर्वेक्षणासह विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आरोग्य पथकाकडून गावातील नागरिकांचा ताप नमुना सर्वेक्षण करण्यात आले. तसेच किटक सर्वेक्षणावरही यावेळी भर देण्यात आला. काही ठिकाणी उंदराचे पिंजरे लावून किटकाचा शोध घेण्यात येत असून तसेच घरोघरी जाऊन तापाचे औषध देण्यात आले. स्क्रब टायफस् या आजाराची गंभीर दखल घेत संपूर्ण गावात आरोग्य प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भुस्कुटे, डॉ. गिरी यांच्या पथकासोबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे गुलवाडे, डोंगरे, कानपूरे, डाबेराव, कांडलकर, वाळणे, श्रीमती गावंडे, श्रीमती महाजन, श्रीमती ढेंगे, श्रीमती वेले, श्रीमती इंगळे, श्रीमती गवात्रे सहभागी झाले होते. ग्रामपंचायत ने गावात दंवडी देऊन स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले आहे.
रक्त नमुन्यांची तपासणी!
आरोग्य विभागाच्या पथकाकडून हातरुण येथील नागरिकांच्या रक्तजल नमुने घेण्यात आले. पथकाकडून तापीच्या रुग्णाचे संकलीत नमुणे तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात येतील. अशी माहिती डॉ. गिरी यांनी दिली.
सर्वेक्षणाद्वारे किटाणुचा शोध!
आरोग्य विभागाच्या पथकाकडून रविवार आणि सोमवारी ताप सर्वेक्षण करण्यात आले. तसेच रक्तजल नुमने संकलित करण्यात आल्यानंतर किटक सर्वेक्षणाद्वारे किटाणुचा शोध घेण्यात आला.
गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून तापीच्या रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. घर व परिसराची स्वछता ठेवण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे. – डॉ. भुस्कुटे, प्रा. आरोग्य केंद्र, हातरुण.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola