अकोला (शब्बीरखान): भारिप बहुजन महासंघ अकोला महानगर (पश्चिम) ३० मतदार संघातील मतदारांकरिता नोंदणी अभियान राबवीत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देशभर मतदार नोंदणी अभियान राबविले जात आहे. परंतु अकोला पश्चिममधील बऱ्याच प्रभागांमध्ये बीएलओ घरोघरी पोहचले नाही. हे बीएलओ प्रत्येक घरी पोहोचण्याची वाट न पाहता आपले नाव मतदार यादीत नोंदणी करण्याकरिता भारिप बहुजन महासंघ पक्षातर्फे मतदारांसाठी ऑनलाईन मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.
यामध्ये ज्याचे वय १८ वर्ष झालेले आहे पण मतदार यादीत नाव समाविष्ट केले नाही अशा व्यक्तींनी मतदार नोंदणी करणे तसेच मतदार यादीत पत्ता बदलणे, नावातील चुका दुरूस्त करणे याचा समावेश आहे. मतदान हे आपले कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदार मतदार नोंदणी हे पहिले पाऊल आहे. ज्या मतदारांनी अजून नाव नोंदणी केली नाही त्यांनी ऑनलाईन नोंदणी करून आपले कर्तव्य बजवावे असे आवाहन अकोला महानगर अध्यक्ष सिमांत तायडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
नायगाव येथे मतदार नोंदणी अभियानाचे उद्घाटन करतांना पक्षाचे माजी नगरसेविका सौ. वंदना वासनिक, शेख नाजीम, राजेश तायडे, अन्नू ठेकेदार, इमरान कुरेशी, मुज्जमील पठाण, रहेमान कुरेशी, प्रफुल्ल खंडेराव व नायगावं येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola