अकोट : महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मा रवि वैद्य आणि अकोला जिल्हाध्यक्ष मा निलेश किरतकार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संपर्क प्रमुख अश्विन पितांबरवाले यांनी संपूर्ण अकोट शहरात बंदोबस्तासाठी असलेले पोलीस दल यांना सामाजिक बांधिलकी म्हणून अल्पोहर आणि जेवण दिले.
संघटनेने पोलीस कुटुंबीय आणि त्यांच्या पाल्यासाठी पोलीस भरती मध्ये 5 टक्के आरक्षण मिळवून दिले आहे. संघटनेच्या राज्यभर शाखा असून ही संघटना सदैव पोलिसांसाठी विविध उपक्रम राबवित असते. गर्दीतला माणूस सुरक्षित रहावा म्हणून खाकी वर्दीतील पोलीस बांधव अहोरात्र जनतेच्या सुरक्षेसाठी झटतात. म्हणून पोलिसांप्रति आदर आणि त्यांच्या कल्याणार्थ संघटना नेहमी सज्ज असते
यावेळी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष मा शिवराज इंगळे, विद्यार्थी आघाडीचे तुषार ताले, मंगेश पारस्कार अकोट तालुकाध्यक्ष अनिल वगारे व समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा : गोरगरीबांचे जीवनमान बदलवणारी आयुष्यमान भारत योजना तळागाळापर्यंत पोहोचवा – पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola