तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथिल नागरीक पाणी पुरवठा त्वरीत चालु करावा या मागणीकरीता धडकलेले तहसिल कार्यालयावर पाणी पुरवठा सुरळीत करण्याची केली निवेदनाव्दारे मागणी सदर निवेदनाच्या प्रति उपकार्यकारी अभियंता तसेच गटविकास अधिकार यांणा देण्यात आला यावेळी या गावामध्ये शेकडो नागरीकांनी अवैद्य कनेक्शन घेतले असुन त्यांचे कनेक्शनृ कापण्यात यावे अशी मागणी करण्यात आली तसेच चवदाव्या वित्त आयोगाच्या निधीमाधुन विद्युत बिल भरण्याची तरतुद असतांना सुध्दा महावितरण कंपनीचे बिल यामाधुन का भरण्यात येत नाही असा सवाल अँड श्रीकांत तायडे यांणी उपस्थितीत केला आहे महावितरण कंपनीने मागील तेरा दिवसापासुन विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे त्यामुळे काही नागरीक टँकरव्दारे पाणी विकत घेत आहेत परंतु सामान्य गोरगरीब नागरीकांना टँकर व्दारे पाणी विकत घेणे शक्य होत नसल्याचे त्यांचे पाण्यासाठी हाल होत आहेत गावातील प्रशासनाच्या कृपने अवैद्य नळ शेकडो नळ कनेक्शन आहेत त्यामुळे नियमीत बिल भरुन ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करणाऱ्यांचे सुध्दा हाल होत आहेत पाणी हे अत्यावश्यक जिवनाश्यक बाब असुन सध्या गणपती उत्सव सुरु असुन यापुढे नवराञ दसरा दिवाळी तसेच सणउत्सव आहेत या सर्व बाबींचा विचारा करुन बंद असलेला पाणी पुरवठा त्वरीत पुर्ववत करावा अन्यथा आमरण उपोषनाला बसण्याचा मार्ग अवलंबवावा लागेल अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली या निवेदनावर शंकर गोमासे, देविदास वरठे, अँड श्रीकांत तायडे, शेषराव इंगळे , बाळकृष्ण अरबट, संदिप राऊत, तुळशिराम येणकर, अतुल निमकर्डे, श्याम दाते,भिमराव तायडे, ब्रम्हदेव येणकर, राहुल तायडे, विजय खंडेराव, उमेश उंबरकार, रोषन मलीये , मयुर मलीये , शेख राजीक, विजय इंगळे याच्या सह्या आहेत.
अधिक वाचा : तेल्हारा शहरात भर चौकात केला विद्यार्थिनीचा विनयभंग
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola