अकोट (प्रतिनिधी): अनंत चतुर्दशी च्या मुहूर्तावर संपूर्ण राज्यात गणेशाचे विसर्जन होत असताना अकोट शहरात मात्र फक्त घरगुती गणपती चे विसर्जन करण्यात आले.शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे सामूहिक विसर्जन मिरवणूक सोमवारी निघणार आहे.
घरगुती गणेशाना निरोप गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर स्थापन झालेल्या घरगुती गणेशांना घरोघरी निरोप देण्यात आला. गणेशाची मनोभावे पूजाअर्चा करून भाविकांनी समीक्षा भावनांनी निरोप दिला.घरगुती गणेशा पैकी काही मंडळानी घरीच विसर्जन केले, काहींनी सूतगिरणी च्या आवारातील पाणी टाक्यां मध्ये विसर्जन केले,काही मंडळ गणेश मूर्ती घेऊन सहकुटुंब पोपटखेड येथील धरणाच्या ठिकाणी विसर्जनसाठी गेली होती,काही भाविक भक्तांनी त्यांचा शेतामध्ये असलेल्या शेततळ्या मध्ये गणपतींचे विसर्जन केले.गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात भाविकांनी गणरायाला निरोप दिला.
अकोट मध्ये पौर्णिमेच्या दिवशी होणारा गणेश विसर्जना साठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.शांतता व सुव्यवस्थे साठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस विभागाच्या सूत्रांनी दिली.
अकोट शहरात एकूण ६७ सार्वजनिक गणेश मंडळे स्थापन केली आहेत त्यापैकी ४० गणपती मंडळ विसर्जन शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. असामाजिक तत्त्व व शांतता भंग करणार्यावर नजर ठेवण्यासाठी २६ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.दारू पिणारे व मोठ्या आवाजात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यासाठी अनुक्रमे ब्रेथ अॅनालायझर व साउंड अॅनालायझर या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.गणेश विसर्जनासाठी सार्वजनिक मंडळे पोपेटखेड धरण व पूर्णा नदीवर आदी ठिकाणी जातात.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने या जलसाठ्यात चांगले पाणी असल्याने विसर्जनाची समस्या मिटली आहे.मिरवणूक वर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर,उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे,शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके,ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद बहाकार हे जातीने लक्ष ठेवून राहतील.
असा राहील बंदोबस्त
उपविभागीय पोलिस अधिकारी ०२ पोलीस निरीक्षक ०८ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक १६ एएसआय हेड कॉन्स्टेबल व पोलीस महिला कर्मचारी ३५० गृहरक्षक दलाचे जवान २५ त्या शिवाय एसआरपीचे ०२ तुकडी सीआरपी ०१ तुकडी व आरसीपी ०२ तुकडी मुख्यालय पोलीस एलसीबी तथा तालुक्यातील पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात राहणार आहे या शिवाय शहराच्या बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची नाकेबंदी करून तपासणी करण्यात येणार आहे.त्याच प्रमाणे सवदेशील भागा मध्ये या वर्षी वाच टॉवर ची संख्या वाढविण्यात आली आहे.
नियमाचे सर्वानी पालन करावे
न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वांनी पालन करावे ध्वनी मर्यादेबाबत कुठलीही सूट दिलेली नाही.डीजे वाजू शकत नाही तरी कृपया कुठल्याही अफवार विश्वास ठेवू नये. दिलेल्या नियमांचे सर्वांनीच पालन करावे पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. – गजानन शेळके,ठाणेदार शहर पो.स्टे.अकोट
अधिक वाचा : पनोरी येथील जिल्हा परीषद शाळा ऊठली विद्यार्थाच्या जीवावर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola