तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा शहरात शाळकरी मुलीची भर चौकात छेडखानी सदर युवती ही ग्रामीण भागातुन तेल्हारा येथे शाळेत येणेजाणे करित असते परतु रविवारी खाजगी वर्गात परिक्षा देण्यासाठी आलेल्या युवतीचा काही रोड छाप मजनुनी छेडछाड केल्याची घटना आज भर चौकात घडली.
तेल्हारा शहरातील चार चिडीमारानी विनयभंग करण्याचा प्रयन्त तेल्हारा शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे असलेले अमित कैलास पुरोहीत ,दिपक वानखडे,भंल्या उर्फ पवन मुराई,ऋषभ ठाकुर सर्व रा. तेल्हारा यांनी या युवतीचा भर चौकात गाडीने कट मारुन काली काली असे अपमान कारक चिडवुन विनयभंग केला यांच्या विरुध्द तेल्हारा पोलिस स्टेशन मध्ये भा.द.वी.चे कलम 354 (ड) ,504 ,34 सह कलम 12 पोस्को अतर्गत कार्यवाही करुन अमित पुरोहीत व एक अश्या दोन आरोपीना तेल्हारा पोलिसानी ताब्यात घेतले असुन दोन आरोपी फरार झाले आहेत तेल्हारा शहरात या प्रकरणा मुळे एकच खळबळ उडाली असुन पालकही भयभीत झाले आहेत तेल्हारा येथे सर्व ग्रामीण भागातील मुले मुली शिक्षणाकरिता येतात परतु आता आपल्या पाल्याला पुढचे शिक्षण द्यावे की नाही अशि कुजबुज शहरात होत आहे.
” शहरातील अशा टवाळखोर व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांची पोलीस गय करणार नसुन आजच्या प्रकरणातील फरार दोन्ही आरोपींचा शोध पोलीस घेत असून या आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.”- विकास देवरे( ठाणेदार ,पो स्टे तेल्हारा)
अधिक वाचा : बहुजनानी अँड बाळासाहेब आबेडकर यांचे विचार घराघरात पोहचवा- जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola