अकोला (प्रतिनिधी): संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाचे यंदा अकोला येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे. बुधवार २६ सप्टेंबर ते शनिवार २९ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या युवा महोत्सवाच्या निमित्याने अकोला शहरात संपूर्ण पश्चिम विदर्भातील तरुणाई अवतरणार आहे.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने अखिल भारतीय विद्यापीठ संघाकडून मान्यता प्राप्त कलाप्रकारांकरिता व नियमानुसार आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची माहिती पुस्तिका, नियमावली, सहभागी कलावंतांचे ओळखपत्र आणि संघ व्यवस्थापकाने करावयाची कार्यवाही, स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक आणि विविध कलाप्रकारांसाठी असलेले नियम व विनियमावली, युवा महोत्सव बाबतचे नियम आदी माहिती सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना देण्यात आली आहे. या शिवाय संपूर्ण माहिती विद्यापीठाच्या संकेत स्थळावरील स्टुडन्ट डेव्हलपमेन्ट मधील स्टुडन्ट डेव्हलपमेन्ट लेटर २०१८ या शिर्षामध्ये देण्यात आली आहे. बुधवार २६ सप्टेंबरला सकाळी ११ वाजतापासून लोकनृत्य, शास्त्रीय गायन, एकांकिका, स्किट व माईम, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा व कोलाज इ. स्पर्धा होणार आहे. गुरूवार २७ सप्टेंबरला सकाळी ८.३० वाजतापासून शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, भारतीय समूहगान, सुगम संगीत, एकांकिका, स्किट व माईम, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्पॉट पेंटींग व पोस्टर मेकिंग स्पर्धा होणार आहे. सकाळी ११ वाजता क्विज लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
शुक्रवार २८ सप्टेंबरला सकाळी ८.३० वाजतापासून लोकनृत्य, भारतीय समूहगान, सुगम संगीत, एकांकिका, स्किट व माईम, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा, कार्टुनिंग व क्ले-मॉडलिंग व क्विज अंतीम फेरीच्या स्पर्धा होणार आहे. शनिवार २९ सप्टेंबरला सकाळी ८.३० वाजेपासून लोकनृत्य, फोक ऑर्केस्ट्रा, वेस्टर्न (पाश्चिमात्य सोलो व ग्रुप), सुगम संगीत, ताल वाद्य, स्वर वाद्य, भारतीय समुहगान, एकांकिका, स्किट व माईम, मिमिक्री व रांगोळी स्पर्धा होतील. सायंकाळी ५ वाजता अकोला येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील स्व. डॅडी देशमुख खुला रंगमंच येथे समारोप समारंभ होणार आहे. सहभाग व सादरीकरण संदर्भात कार्यवाही सर्व महाविद्यालयांनी याबाबत नोंद घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीकरिता विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. रविंद्र सरोदे, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे किंवा त्याच महाविद्यालयातील डॉ. किशोर देशमुख व प्रा. हर्षवर्धन मानकर यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
अधिक वाचा : ढोल-ताश्याच्या निनादात विघ्नहर्त्याला अखेरचा निरोप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola