अकोला (शब्बीर खान): गणपती बाप्पा मोरया पुढच्यावर्षी लवकर या अश्या अनेक घोषणांच्या निनादात मंगलमय आरतीच्या स्वरात विघ्नहर्त्या गणरायाला हजारो भक्तांच्या साक्षीने आज रविवारी विविध मंडळाच्या वतिने अखेरचा निरोप देण्यात आला. उत्साही वातावरणात ढोल ताशांच्या गजरात पारंपारीक पद्धतीने रविवारी सायांकाळी 5 वाजेच्या सुमारास सुरु झालेल्या विसर्जन मिरवणूकीची सांगता रात्री 10 वाजेच्या दरम्यान पुर्ण झाली. गणेश विसर्जन मिरवणूकीत मानाचे 8 ते 9 मंडळे सहभागी झाली होती. कुठलेही विघ्न न येता गणेश विसर्जन शांततेत पार पडले. यंदा मात्र संध्याकाळनंतरच विसर्जन मिरवणूकीत उत्साह दिसून आला.
8 ते 9 गणेश मंडळाच्या गणरायाची पालखी मिरवणूक ट्रॅक्टरमध्ये काढण्यात आली. तसेच पारंपारिक पद्धतीने गणरायाची विधीवत पुजा करण्यात आली. ढोल-ताशांचे पथकाने जोरदार सलामी दिली. या उत्साही वातावरणात निघालेली मिरवणूक हळूहळू पुढे सरकु लागली. तसे एका मागोमाग एक गणेश मंडळे मिरवणूकीत सहभागी झाले होते ज्या मध्ये एकता गणेश मंडळ , जय बजरंग मंडळ , जय बारुद मंडळ , जय देवा मंडळ , जय हनुमान मंडळ , जय शिवाजी मंडळ , जय श्री राम मंडळ , जय महर्षि वाल्मिकी मंडळ सहभागी झाले होते. तसेच गणेश विसर्जन मिरवणूकीत कुठलाही अनूचीत प्रकार घडू नये म्हणून दहिहांडा पोलिस स्टेशन चे थानेदार प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शांतीलाल भिलावेकर तसेच त्यांचे सहकारी यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता दहिहांडा गावाच्या मुख्य मार्गाने गणेश मिरवणूका निघाल्या. यंदा गणेश विसर्जन मिरवणूकीत उत्साह दिसून आला नाही डीजेवरील बंदीचा परिणाम झाल्याचे दिसून आले. तर दहिहांडा गावाच्या सर्व मंडळांचे गणेश विसर्जन रात्री 10 नंतर गांधिग्राम च्या पुर्णा नदी पात्रा वर शांततेत पार पाडण्यात आले.
ब्रेकिंग: गांधीग्राम येथे गणपती विसर्जनाच्या वेळी एक जण वाहून गेला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola