अकोला (शब्बीर खान): नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन तसेच वाहतुकीच्या दृष्टीकोनातुन बाळापूर येथील भिुकुंडखेड गावाजवळील भिकुंड नदी पात्रातच गणेश मुर्तिचे विसर्जन करण्यात यावे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ०६ वरील कोणत्याही ठिकाणावरून गणेश मुर्तिचे विसर्जन करण्यापासून २३ सप्टेंबर २०१८ चे सकाळी ०६.०० ते २४ सेप्टेंबर च्या रात्री ०७.०० पर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत. अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रं. ०६ वरील बाळापूर स्थित भिकुंड नदी व मन नदी मुलावरून गणेश मुर्ती विसर्जीत करण्यात येते. परंतू सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुक व्यवस्था विस्कळीत होते व अशा परिस्थितीमध्ये अपघात होण्याची दाट शक्यता असुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन तसेच वाहतुकीच्या दृष्टीकोनातून बाळापूर येथील भिकुंडखेड गावाजवळील भिकुंड नदी पात्रात गणेश मुर्ती विसर्जन करणेबाबत तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ०६ वरील भिकुंड नदी व मन नदी पुलावरून गणेश मुर्ति विसर्जन करण्यात येवू नये, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.