तेल्हारा(प्रतिनिधी)- तालुक्यातील ग्राम खापरखेड येथे एक इसमाला जबर मारहाण झाली होती तर त्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी गावातील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.मारहाण प्रकरणातील आरोपींनी धमकवल्याने माझा मुलाने आत्महत्या केल्याची तक्रार तेल्हारा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती याप्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे हे करीत होते.आज अखेर खापरखेड येथील चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करन्यात आले आहे.
अधिक सविस्तर बातमी:
१. खापरखेड येथे एकास चामड्याच्या पट्ट्याने जबर मारहाण
२. खापरखेड येथील सतरा वर्षीय युवकाने घेतला गळफास
३.खापरखेड येथील मारहाण व आत्महत्या प्रकरणात आत्महत्याग्रस्त युवकाच्या आईने दिली चौघांविरुद्ध तक्रार
ग्राम खापरखेड येथील श्रीधर काळमेघ या इसमास दि १५ सप्टेंबर रोजी गावातील सोपान ताथोड ,ज्ञानेश्वर ताथोड,अंकुश डाबेराव,सतीश ताथोड या चार जणांनी पाईप व चामडी पट्ट्याने जबर मारहाण केली होती.ज्या वेळी मारहाण करण्यात आली.त्यावेळी आत्महत्या केलेला युवक सागर वानखडे तिथे उपस्तिथ होता.त्यावेळी मारहाण करणाऱयांनी त्याला धमकवल्याने माझा मुलाने आत्महत्या केल्याची तक्रार आत्महत्या केलेल्या युवकाच्या आईने तेल्हारा पोलिस ठाण्यात दिली होती.तक्रारीमध्ये सोपान ताथोड,सतीश ताथोड,ज्ञानेश्वर ताथोड,संतोष ताथोड या चार जणांनी माझा मुलाला धमकावून आत्महत्येस पररावृत केले असे तक्रार अर्जात नमूद केले होते.याप्रकरणाचा तपास स्वतः उपविभागीय अधिकारी सुनील सोनवणे यांनी आपल्या हाती घेतला होता.तपास केला असता सदर प्रकरणात दोषी आढळल्यावरून तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये अखेर आज दुपारी ३ वाजता खापरखेड येथिल आरोपी१) सोपान संतोष ताथोड २)ज्ञानेश्वर संतोष ताथोड ३) सतिष महादेव ताथोड४)संतोष महादेव ताथोड या चार आरोपी विरुध्द३०६,५०६,३४ भादवि कलमासह अनुसुचीत जाती अनु जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ सुधारीत अधिनियम २०१५ ३(२)va प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणाचा तपास उपविभागिय पोलीस अधिकारी सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे करीत आहेत.