क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा क्रिकेटपटू विराट कोहली बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सोशल मीडियावर त्याचं एक पोस्टर व्हायरल झाल्यानं त्याच्या या सिनेमाविषयीची त्याच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्याच्यासोबत त्याची हिरोईन म्हणून अनुष्का शर्मा असणार का?, हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार? त्यात आणखी काही क्रिकेटपटू असतील का? आदी चर्चा सोशल मीडियावर झडताना दिसत आहेत. मात्र वास्तव काही वेगळच आहे.
Another debut after 10 years, can’t wait! ? #TrailerTheMovie https://t.co/zDgE4JrdDT pic.twitter.com/hvcovMtfAV
— Virat Kohli (@imVkohli) September 21, 2018
विराट कोहली सिनेमात काम करणार आहे. पण हा काही तीन तासांचा सिनेमा नाही. ही शॉर्ट फिल्मही नाही आणि डॉक्युमेंट्री फिल्मही नाही. ही एक अॅड फिल्म आहे आणि त्याचंच पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे. अगदी एखाद्या अॅक्शनपॅक्ड सिनेमाच्या थाटातच हे पोस्टर तयार करण्यात आलं आहे. स्फोटामुळे झालेलं अग्नितांडव आणि गाड्यांचा झालेला चक्काचूर आणि त्यातून होणारी विराटची एन्ट्री असं हे पोस्टर आहे. त्याच्या टी-शर्टवर प्रॉडक्शन हाऊसचा लोगोही दिसत आहे. त्याच्या ‘ट्रेलर’ या आगामी अॅड फिल्मचे हे पोस्टर आहे. यापूर्वीही रणवीर सिंह आणि रोहीत शेट्टी यांचंही अॅड मुव्हीसाठीचं पोस्टर रिलिज झालं होतं. पण चर्चा मात्र विराटच्या पोस्टरचीच होताना दिसतेय.
अधिक वाचा : सलमान च्या लव्हरात्री चित्रपटाचे नाव बदलले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola