अकोला : अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर यांच्या आदेशानुसार अकोला शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने(पाटील)यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकाचे प्रमुख तुषार नेवारे यांच्या नेतृत्वाखाली अवैध पणे गोवंशाची तस्करी करतांना 3 आरोपींना रंगेहाथ अटक केली असून दोघे फरार होण्यात यशस्वी झाले.त्यांच्या कडून 3गोरे आणि 3 बैल असे तीन ताब्यात घेऊन,त्या गोवंशाची म्हैसपूर फाट्यावरील गोरक्षण मध्ये रवानगी करून त्यां गोवंशांना जीवदान देण्यातआले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खामगाव वरून अकोला येथे चार चाकी वाहनातून कत्तली साठी जनावरे येत असल्याची गोपनीय माहिती,अकोला शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने(पाटील)यांना मिळाली त्या माहितीच्या आधारे त्यांनी त्यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक तुषार नेवारे कारवाई करण्याचे आदेश दिल्यावर, डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अकोला ते खामगाव रोडवरील शेगांव टी-पॉइंट समोरील तुषार हॉटेल जवळ खामगाव कडून येणाऱ्या दोन संशयित टाटा मॅजिक छोटा हाथी गाडीत प्रत्येक गाडीत तीन तीन गोवंश आढळून आले. टाटा मॅजिक गाडीसह 6 गोंवंश सह तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. परंतु यातील दोन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.
एसडीपीओ माने(पाटील)यांच्या पथकाने एम. एच.04-इ.एल-1134आणि एम.एच.30.ए.बी-3735 दोन चारचाकी वाहन 6 गोवंश असा एकूण 3 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमासह शंकर बेनिवाल,रा.खामगाव,शुभम यादव मोहता मिल चाळ, अकोला.शे. जमीर,अकोला यांना अटक करण्यात आली,आरोपींविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत कलमाखाली गुन्हा दाखल करून असून पुढील तपास करण्यासाठी आरोपींसहीत मुद्देमाल डाबकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.आहेत. पुढील तपास डाबकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जे.एस.मिश्रा करीत आहे.
अधिक वाचा : शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी २ ऑक्टोबर पासून अकोला जिल्हा दाैऱ्यावर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola