मुंबई- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून २१ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात याच्या परिणामी पावसाचे संकेत आहेत. विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात २१ आणि २२ सप्टेंबर रोजी पाऊस पडेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांसह आसपासच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाच्या या स्थितीमुळे नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते, पुरामुळे काही गावांचा संपर्कदेखील तुटू शकतो. म्हणूनच नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी सावध राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला अाहे. उर्वरित विदर्भ, मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र आणि खान्देशात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडेल. मुंबई आणि कोकणातदेखील यादरम्यान पावसाच्या काही सरी कोसळतील.
अधिक वाचा : सर्वाधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या २० अामदारांत महाराष्ट्राचे हे 4 आमदार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola