नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत सवुर्ण कामगिरी करणारा भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया ने भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेल रत्नसाठी त्याचा विचार करण्यात न आल्याने नाराजी व्यक्त केली आहे. भारत सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या सर्वोच्च खेळ पुरस्कार राजीव गांधी खेलरत्नसाठी नामांकन जाहीर झाली आहेत. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मिराबाई चानू यांना या पुरस्कारासाठी नामांकने घोषित झाली आहेत.
जकार्ता आशियाई स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात फ्रिस्टाईल कुस्तीत भारताला सुवर्ण पदक जिंकून देणारा बजरंग पुनियाने खेलरत्न पुरस्कारासाठी डावलण्यात आल्याचा आरोप केला आहे. बजरंग पुनियाने खेल रत्न पुरस्कारासाठी त्याच्या कौश्यल्याची आणि कामगिरीची दखल घेतली नसल्याने दुखः झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
या विषयासंदर्भात त्याच्याशी संवाद साधला असता त्याने या विषयी केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्याशी संपर्क साधला होता पण, त्यांनी कोणतीही प्रतिक्रया दिली नाही असे त्याने सांगितले. तो पुढे म्हणाला की ‘माझी कामगिरी जगजाहीर आहे. मी देशासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. अजून काय करणे अपेक्षित आहे हेच कळत नाही. जर मला क्रीडा मंत्र्यांकडून न्याय मिळाला नाही तर मी कोर्टाचा दरवाजा ठोठावण्यावाचून पर्याय नाही.’ पुनियाने इतर खेळाडूंना खेल रत्न देण्यास विरोध नसल्याचे सांगितले. सध्या तो पुढील महिण्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची तयारी करत आहे.
अधिक वाचा : आशिया कप : हार्दिक पंड्या आशिया कपमधून बाहेर, दीपक चाहरला संधी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola