हिवरखेड (सूरज चौबे): येथील सर्वे नंबर 17/4 शैलेश कॉलोनी, मेन रोड हिवरखेड येथे ग्रामपंचायतचे शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम जोमात सुरू असून सदर बांधकाम अनधिकृत जागेत असल्याचा आणि सदर जागा ग्रामपंचायतची नसल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.
सदर जागेच्या मालकी हक्कांबाबत ग्रामपंचायत जवळ कोणतेही अधिकृत दस्तावेज उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाल्याचे अर्जदार पवन नेरकर यांचे म्हणणे आहे सन 2008 –2009 मध्ये या जागेवर बांधकामाचा ठराव घेण्यात आला होता परंतु जागेचा मालकी हक्क नसल्याचे लक्षात आल्यावर सदर बांधकाम दुसऱ्या जागी करण्यात आले होतेे असेही अर्जदारांनी सांगितले. पण विद्यमान सरपंच व ग्रामसेवकांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कायद्यानुसार पदाचा दुरुपयोग करून शैलेश कॉलनीमधील रहिवाशी लोकांचा वैयक्तिक स्वार्थासाठी विश्वासघात केल्याचे दिसून येत असल्याचे अर्जात नमूद आहे सदर अनधिकृत बांधकाम सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कारवाई करून तात्काळ थांबवावे असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून हे बांधकाम दोन दिवसात बंद न केल्यास मनसे आणि गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री,गृहमंत्री, पालकमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विस्तार अधिकारी, ठाणेदार, इत्यादींना निर्गमित केल्या आहेत आता याप्रकरणी पुढे कोणता निर्णय होतो याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
“शॉपिंग कॉम्प्लेक्स चे काम ग्रामपंचायत च्या जागेवरच होत असून हे काम नियमानुसार सुरु आहे. विकासकामांना जाणून बुजून विरोध केल्या जात आहे” – सौ शिल्पाताई भोपळे, सरपंच, हिवरखेड.
अधिक वाचा : हिवरखेड येथे पंतप्रधान व भाजप शहराध्यक्ष यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola