अकोला(शब्बीर खान)-अकोला जिल्हा अंतर्गत येत असलेल्या चान्नी पोलीस स्टेशनचा हद्दीत येत असलेल्या, आलेगाव मळसूर(पांगारा)रोडवर १९सप्टेंबरच्या सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान, ठाणेदार प्रकाश झोडगे आणि पोलीस कर्मचारी गस्तीवर असताना मोटारसायकल वरून देशी दारूची अवैध पणे वाहतूक करताना दोघांना रंगेहाथ अटक केली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलेगाव पासून जवळच असलेल्या मळसूर(पांगारा)रोडवर १९सप्टेंबरच्या सायंकाळी ७ वाजता दरम्यान मोटारसायकल वरून अवैध रित्या देशी दारूच्या पेट्या नेत असताना प्रशांत स्वामी दंडावणी वय २६ वर्ष आणि श्रीनिवास बालायन नाईनी वय३६वर्ष यांना अटक करण्यात आली. त्यांच्या कडून १४हजार३००रुपयांच्या देशी दारू टॅगोपंच च्या ६पेट्या आणि एम.एच.३०ए. एच.९८८०क्रमांकाची ३०हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण४४,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यांच्या विरुद्ध अप क्रमांक२३३/१८कलम क ६५ई गुन्हा दाखल करून करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल किशोर पिंजरकर,पोलीस कॉन्स्टेबल सानप,पोलीस कॉन्स्टेबल बुधवं यांनी केली