दुबईत सुरू असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत जखमी झालेल्या हार्दिक पंड्याला आशिया कप स्पर्धेतून डच्चू देण्यात आला आहे. पंड्यासह शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. तर पंड्याच्या जागी दीपक चाहरला संधी देण्यात आली असून तो दुबईत दाखल झाला आहे.
गुरुवारी पाकिस्तान विरोधातील ग्रुप मॅच दरम्यान हार्दिक पंड्या जखमी झाला होता. तो मैदानातच कोसळल्याने त्याला स्ट्रेचवरून मैदानाबाहेर नेण्यात आले होते. त्यामुळे तो आशिया कप मधील पुढचे सामने खेळू शकणार नसल्याची शक्यता वर्तवली जात होती. तो अजूनही बरा न झाल्याने अखेर त्याला विश्रांती देण्यात आली आहे. पंड्याच्या कमरेला मार लागल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे.
आज भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. पंड्याच्या जागी दीपक चाहरला तर लेग स्पिनर अक्षर पटेलच्या जागी रवींद्र जडेजाला स्थान देण्यात आले आहे. अंगठ्याला मार लागल्याने अक्षरलाही विश्रांती देण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या जागी सिद्धार्थ कौलला संधी देण्यात आली आहे. संघातील या बदलाला बीसीसीआयनेही दुजोरा दिला आहे.
अधिक वाचा : भारत समोर पाकची शरणागती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola