दहीहंडा(शब्बीर खान)- दहिहांडा परिसरात गेल्या अनेक दिवसा पासुन पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या करीता अकोट उपविभागीय अधिकारी मा.जि.प्रा.अकोट यांच्या कार्यालयात पाणि पुरवठा योजनेतील अधिकारी व कर्मचारी यांची बैठक आज दि.१९/९/१८ रोजी बोलवण्यात आली होती. या बैठकिला उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख गोपालभाऊ दातकर , दहिहांडा शिवसेना शाखा प्रमुख गजानन वानखळे , रोहणा ग्रा.पं.रसरपंच व शिवसेना दहिहांडा सर्कल प्रमुख अविनाश राऊत , मा.जि.प्रा उपविभागीय अधिकारी हावळे व शाखा अभियंता इंगळे सर्व उपस्थित होते.
दहिहांडा परिसराच्या गावकऱ्यांचा असे बोलने आहे कि दहिहांडा परिसराच्या समोरील गावातील कर्मचारी त्यांची मनमानी करीत आहे. त्यांच्या मनमानी पणे वॉल उघडत असल्याने दहिहांडा परिसरातील वडद(खुर्द) , गणोरो , रोहणा , ब्रम्हपुरी , ठोकबर्डी , जउळखेड , काटी, पाटी , केळीवेळी , अश्या अनेक गावांना सात ते आठ दिवसांना पाणी पुरवठा तरण्यात येत आहे नळ सातआठ दिवसा नंतर येत असल्याना नागरीकांना खुपच त्रास सहावा लागत आहे हा पाणि पुरवठा पहिल्या सरखाच सुरळीत करावा अशी मांगणी शिवसैनिक व गावकरी करीत आहेत. आज दि.१९/९/ १८ रोजी घेतलेल्या बैठकीत मांगणी करण्यात आली . तसेच अधिकारी कर्मचारी यांनी मनमानी केल्यास तसेच 2 ते 3 दिवसा च्या आत पाणी पुरवठा सुरळीत न केल्या गाढवावरुन धिन्ड काढण्याचे दहिहांडा परिसरातील शिवसैनी कांनी मा.जि.प्रा उपविभागीय अधिकारी हावळे व शाखा अभियंता इंगळे यांना सांगितले.
अधिक वाचा : मुस्लिम बांधवाकडे गणेशोंत्सव मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola