तेल्हारा(शुभम सोनटक्के )- शहरात गेल्या काहि दिवसा पासुन टवाळखोर युवकांनी धुमाकुळ घातला असुन हे टवाळखोर युवक स्वयघोषीत दादा बनले आहेत. मुख्य चौकांमध्ये हे अमली पदार्थाचे सेवन करुन शाळकरी मुलींना त्रास देतांना दिसत असुन यामुळे शहरात भांडणे होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पोलीसांसमोर उभा ठाकला आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासुन अमली पदार्थ (गांजा) याचे सेवन करणाऱ्या युवकांचे प्रमाण वाढलेले आहेत. शाळकरी विद्यार्थ्याना या अमली पदार्थाची लत लागली आहे जवळ्पास १५ ते २० वयोगटातील मुले यामध्ये अडकले असुन शहरात या पदार्थाचे सेवन करुन नशेमध्ये हे मुले कायदा व सुव्यवस्था तसेच चिडीमारी करतांना खुलेआम दिसत आहेत अशातच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे व त्यांना बढावा देणारे काहि स्वयंघोषीत नेते ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अशांची पोलीस स्टेशन आवारात रेलचेल असते अशातच काहि पोलीस कर्मी या स्वयंघोषीत नेत्यांची वरचढ करतांना नेहमी पाहावयास मिळतात. तेल्हारा पो.स्टे.ठाणेदार विकास देवरे यांनी रुजु झाल्यापासुन दोन वेळा अशा युवकांना चांगलाच चोप दिला असुन मध्यस्थी मुळे सदर युवकांना गुन्हे दाखल न करता सोडल्याने त्यांचे मनोबल वाढेल असुन कर्तव्यदक्ष ठाणेदार देवरे यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या युवकांचा बंदोबस्त करावा जेणेकरुन सण उत्सव काळात शांतता प्रस्थापित होईल.
या ठिकानि असतात या टवाळखोर युवकांचे लोंढे
शहरातील शेगाव नाका, माऊली चौक, जिजामाता उद्यान, टावर चौकजिजामाता नगर , से.ब. विद्यालय, शिवाजी विद्यालय, गो.खे.महाविद्यालय तसेच कोचिंग क्लासेस या ठिकाणांसह अनेक ठिकाणी या टवाळखोरांचे तसेच चिडिमाराचा प्रताप पाहावयास मिळतो.
अशा टवाळखोर युवकांचा पोलीस शोध घेत असुन दिवसा पेट्रोलिंगच्या माध्यमातुन शहरात शांतता प्रस्थापित करण्याचे काम सुरु आहे कायदा सुव्यव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.- विकास देवरे ठाणेदार पो.स्टे तेल्हारा
अधिक वाचा : तेल्हारा येथे सम्यक विद्यार्थी आदोलन विद्यार्थी मेळावा सपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola