अकोट (सारंग कराळे ) : ग्रामीण पोलिसांच्या पुढाकाराने तालुक्यातील अडगाव खु. व अाकोलखेड येथील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मुस्लिमबांधव भुषवित आहेत. ही बाब कौतुकास्पद असून सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविणारे आहे. तालुक्यातील अडगाव खु. येथील आदर्श बाल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गेल्या दोन वर्षापासून वसीम शहा शब्बीर शहा (वय २४) हे आहेत. तर अाकोलखेड येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शेख जब्बार शेख आबु (वय ५२) हे भुषवित आहेत.
अनेक ठिकाणी गणेशोत्सव काळात जातीय तणाव व दंगली घडल्याचा इतिहास आहे. मात्र, अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार मिलिंदकुमार बाहकर यांनी गणेश स्थापनेच्या आगोदर विविध ठिकाणी शांतता बैठकी घेतल्या. त्याचाच परीपाक म्हणून दोन मंडळाचे अध्यक्षस्थान मुस्लिम बांधवांनी स्वतःहून स्विकारले. या दोन्ही मंडळांमध्ये नेहमीत पुजा अर्चा व विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात येतात. विशेष बाब म्हणजे दोन्ही मंडळाचे अध्यक्ष सर्वांना विश्वासात घेऊन आपले पद योग्य पद्धतीने भूषवित आहेत
सामाजिक एकोप्याचा संदेश
अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील पंधरा गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ स्थापन करण्यात आला आहे. या गावांमध्ये नागरिक या मंडळांच्या विविध सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. सर्व कार्यक्रम उत्साहाने व शांततेने साजरे केल्या जातात. ही बाब लक्षणीय असून सामाजिक एकोप्याचा संदेश देणारी आहे.
“अडगाव खु. व आकोलखेड येथील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्षपद मुस्लिमबांधवाकडे आहे. सामाजिक दृष्टीकोनातून अत्यंत कौतुकास्पद बाब असून इतर गावांनीही याचा आदर्श घेण्याची गरज आहे. -मिलिंदकुमार बाहकर, ठाणेदार, ग्रामीण पोलिस स्टेशन, अकोट. “
अधिक वाचा : गणेशोत्संवाची ऑनलाईन परवानगी ऑफलाईन करा – शिवसेनेची मागणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola