अकोट (सारंग कराळे) : संपुर्ण महाराष्टॉत गणेशोत्संव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहांच्या वातावरणात सुरु असुन अकोट शहरात सुद्धा भक्तीमय व उत्सांहात गणेशोत्संव साजरा होत आहे यावर्षी प्रशासनाने ऑनलाईन परवानगी केली असल्याने गणेशोत्सव मडंळाना अतोनात ञास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा तांञीक बिघाड होत असुन वेळेत ऑनलाईन अर्ज भरु न शकल्यांने मडंळे सभ्रंम अवस्थेंत आहेत अकोटात ऑनलाईन अर्ज भरुन घेण्याचे सेंतु केन्द्रावर प्रत्येकी १ हजार रु मोजावे लागत आहेत एवढ सर्व करुनही धर्मादाय आयुक्त कार्यालय, अकोला येथे अनेक मडंळा ञास देत असल्याचे तक्रारी येत आहेत ऑनलाईन परवानगीमुळे अनेक मडंळाना चा ञास अतोनात वाढला असल्याने भविष्यात गणेशोंत्सव न बसवलेलेच बरे अशी गणेशभक्त प्रर्तिक्रीया देत आहेत .
अनेक मडंळे सभ्रंम अवंस्थेत असुन त्याची सभ्रंम अवंस्था दुर करावी व अकोट शहरात अनेक मडंळे मोठ्या उत्साहात दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात परंतु एखाद्या कुठला अपरीह्यार्य कारणावरुन गणेशोत्सव साजरा केला़ नाही पोलीसाची परवानगी काढली नसेल तर दुसरा वर्षी परवानगी पोलीस देत नाहीत.
तसेच लहान व घरघुती ७ दिवसाचे गणपती बसविला त्याना पोलीसानी नोटिसेस दिल्या आहेत त्यामुळे अनेक मडंळे घाबरले आहेत अशा अनेक प्रकाराच्या तक्रारीचे निवेदन मा.सुनिल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट व पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांना देण्यात आले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांच्या नेतुत्वांत तालुका प्रमुख शाम गावडे शहर प्रमुख सुनिल रंदे सुभाष सुरत्ने देवंन्द्र रधे रुपेश गुजर जितु जेस्वाणी गणेश येऊल सागर ताडे गोपाल पायघन हेमंत लाडगे गोपाल बेराड बळीराम हागे रोशन हेड सह शेकडो शिवसैनिक व गणेश मडंळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होेते.
अकोट शहरात ३७ मंडळांना मागील वर्षी मिरवणुकीची परवानगी देण्यात आली होती. त्या मंडळांना ह्या वर्षी पण परवानगी देणार आहोत ज्या मंडळांना ऑन लाईन परवानगी मध्ये अडचण येत असेल त्यांनी पोलीस स्टेशन मधे संपर्क साधावा, त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यात येईल.
गजानन शेळके
पोलीस निरीक्षक
शहर पोलीस स्टे.अकोट
अकोट शहरात गणेशोत्संव उत्सांहात सुरु असुन प्रशासनाने यावर्षी ऑनलाईन परवानगी अर्ज केल्याने तांञीक बिघाड व इतर कारणामुळे अर्ज भरु न शकल्याने सभ्रंम अवस्था निर्माण झाली आहे ते दुर करुन गणेश मडंळाना ऑफलाईन परवानगी देण्यात यांवी.
दिलीप बोचे
शिवसेना उपजिल्हाप्रमुख
अकोट ,अकोला
अधिक वाचा : अकोट शहरात गणेशोत्सव निमित्ताने भव्य रूट मार्च
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola