मूर्तिजापूर (प्रकाश श्रीवास) – मूर्तिजापूर येथून जवळच असलेल्या उमई येथील मनोहर पंजाबराव मानकर यांच्या घरी आज१९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने प्रचंड नुकसान झाले. उमई येथील मनोहर मानकर यांच्या घरात कोणी नसताना घरातील स्वयंपाकाच्या सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने त्यांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, कुलर, मोबाईलसह भांडीकुंडी रोख हजार रुपये जळून खाक झाले. घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटना घडली तेव्हा घरातील तीघेही घरात नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला; मात्र या स्फोटात त्यांचे ४० हजारांचे वर आर्थिक नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार राहूल तायडे यांनी दिली. यावेळी शासनाच्या वतीने सानुग्रह अनुदान म्हणून ४ हजार रुपयांची तातडीची मदत करण्यात आली. घटनास्थळी तहसीलदार राहूल तायडे, तलाठी अलपेश खडसे व गॅस एजन्सीचे अजय चक्रे यांनी भेट दिली.
सिलिंडर स्फोटात मानकर कुटुंबीयांचे ४० हजारांचे जवळपास नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तातडीची मदत म्हणून त्यांना चार हजार रुपये देण्यात आले आहे. घराचे नुकसानाचा अंदाज काढून पुढील रक्कम देण्यात येईल.- राहुल तायडे तहसिलदार , मुर्तिजापुर
अधिक वाचा : मुर्तिजापूर भाजप शहर च्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त स्वच्छ कार्यालय अभियान
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola