अकोला (योगेश नायकवाडे): अकोला जिल्हा ग्रंथालय संघ अकोला ह्यांचे जिल्हा ग्रंथालय समोर आज पासून राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू केले आहे.शामराव वाहूरवाघ यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन केले जात आहे. निवेदनानुसार महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ तसेच त्यांचे संलग्न विभाग ग्रंथ संघ आणि जिल्हा ग्रंथालय संघ तसेच सार्वजनिक कर्मचारी कृती समिती आणि सार्वजनिक कर्मचारी ग्रंथालय संघटना सातत्याने सार्वजनिक ग्रंथालय चळवळीच्या विविध मागण्यांसाठी मागील चार वर्षांपासून आंदोलने, मोर्चे, निवेदने, धरणे, या मार्गाने मंत्री, राज्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्रांकडे पाठपुरावा करीत आहेत तसेच बऱ्याच मंत्र्यांना स्वतः भेटून निवेदन पण दिले आहेत तरीही मागील चार वर्षांपासून सार्वजनिक ग्रंथालयाची मागणी कोणतीही मागणी मंजूर केली गेली नाही.
ग्रंथालयाच्या कर्मचाऱयांना किमान वेतनापेक्षाही कमी वेतन सध्याच्या परिरक्षण अनुदान रचनेनुसार मिळते.त्या अनुदानात वाढ व्हावी तसेच ग्रंथालयांना लागणारी सामुग्री साधने त्यासाठी लागणारे परीक्षण अनुदानात वाढ करावी असे यांचे म्हणणे आहे.शासनाने यापूर्वी केलेल्या अनुदानात दुप्पट वाढ देण्याऐवजी 50 टक्के वाढ देऊन अन्याय केला आहे आणि सात वर्षागोदार शासनाने हि वाढ दिली होती असे निवेदनात नमूद आहे.
आज सकाळपासून धरणे आंदोलन सुरू असताना भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदिपभाऊ वानखडे तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमिरुल्लाखा पठाण ह्यांनी भेट दिली.तसेच सर्व उपस्थित मध्ये श्री.शामराव वाहूरवाघ, मनमोहन तापडिया, श्री राम मुळे, डॉ.एस आर बाहेती, अनुराग मिश्र, सुरेंद्र भाटकर, राजेश डांगटे, अभिमन्यू धनोकर, श्रीकृष्ण वानखडे, रामधन तेलगोटे, संजय इंगळे, मिलिंद खंडारे, शरद लोखंडे, राजेश दांडगे हे उपस्थित होते.
ह्यांच्या पाच मागण्या आहेत
सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना 2012 मधील थकीत असलेले 50 टक्के परीक्षण अनुदान वाढ करून तिन पट अनुदान द्यावे, कर्मचाऱ्यांना किमान वेतनाऐवढे वेतन द्यावे, ग्रंथालय कर्मचाऱ्यांसाठी वेतनश्रेणी, सेवाशर्ती, सेवानियम मंजूर करावेत, शासकीय कामकाजाच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास निश्चित करावे, 2012 पासून बंद केलेला दर्जा बदल व शासन मान्यता सुरु करावी ह्या प्रमुख मागण्या आहेत.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola