अकोला : महात्मा गांधींना जन्म देणारा देश ही भारताची ओळख पुसून त्यांचा खून करणाऱ्यांचा देश अशी आपली ओळख लादली जात असून या परीक्षेच्या काळात आपण फैसला करण्याची वेळ आली आहे असे रोखठोक प्रतिपादन ज्येष्ठ संपादक,लेखक संजय आवटे यांनी येथे केले.
लोकजागर मंचाने मंगळवारी(ता.१८ ) येथील प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित केलेल्या पुस्तक लोकार्पण आणि व्याख्यानात श्री.आवटे बोलत होते,या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.अभय पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री प्रा अजहर हुसेन,प्रा.सतीश फडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, लोकजागर मंच जिल्हाध्यक्ष ऍड विनोद मेहकरे, महानगर अध्यक्ष श्रीकांत पागृत हे मान्यवर उपस्थित होते.
कट्टरता हळूहळू सहिष्णुतेत बदलत असते मात्र आपल्या देशात उलटा प्रवास सुरु झालाय,देश कट्टरते कडून अधिक कट्टर होत आहे , अडवाणी, मोदी आणि योगी ही त्याची चढत्या क्रमाची उदाहरणे आहेत. आपल्या थोर पुरुषांचा वारसा कळू नये म्हणून महापुरुषांचे सतत अपहरण केले जात आहे, गांधी ,नेहरू आणि आंबेडकर हा आपला अस्सल वारसा असताना त्यांनाच एकमेकांच्या विरोधात उभे केले जात आहे. भारताचा इतिहास खऱ्या अर्थाने केवळ ७० वर्षाचा आहे मात्र तो पाच हजार वर्षाचा असल्याची हाकाटी उगाच पिटली जात असल्याचे सांगून आवटे म्हणाले की आता तरी प्रत्येकाने आपल्या सभोवताली विवेकाचा,सजगतेचा उजेड कसा कायम राहील याचा प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन केले.
प्रारंभी लोकजागर मंच सरचिटणीस पुरुषोत्तम आवारे यांनी प्रास्ताविक करून समाजात प्रश्न निर्माणच होऊ नयेत याची काळजी घेतली जात असून मेंदू बोन्साय केले जात आहेत चालते बोलते रोबोट निर्माण केले जात आहेत,हे गंभीर असल्याचे सांगून व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची धमक असणारे मेंदू निर्माण व्हायला हवे असे आवाहन केले. यावेळी मान्यवरांची आवटे यांच्या ‘आम्ही भारताचे लोक ‘या बेस्ट सेलर पुस्तकावर समयोचित भाषणे झाली. सोहल्याचे सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन लोकजागर मंचाचे कार्याध्यक्ष ऍड सुधाकर खुमकर यांनी केले.
अधिक वाचा : विशेष पथकाचा क्लबवर छापा, 33 जण अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola