अकोट(सारंग कराले) : अकोट महसुल विभागाने मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिजाची वाहतुक करणाराच्या विरोधात लाखो रुपयाची दडांत्मक कारवाई करुन ही अकोट महसुल विभागात अवैध गौण खनिजाची वाहतुक थाबंता थाबंत नसुन अवैध गौण खनिज माफीयाच्या मनोबंलावर कुठलाच परीणाम होताना दिसत नाही.दि.१७ सप्टेंबर अकोट तालुक्यातुन पणज येथुन महसुल विभागाची कोणतीही परवानगी न घेता अवैध पणे गिट्टी व मुरुम वाहतुक करीत असताना पणज येथे
१) ०४ टी वाय ४५९९,
२)एमएच,०४ सीजी, २५१
३)एमएच,०४ सीए, ८६३८
४)एमएच, ०४ ईएल ३२९२,
५)एच,०४ ई वाय, ५४९९
क्रमांकाच्या पाच वाहनावर कारवाई करण्यात आली आहे.पैकी यातील एक वाहन चालक ट्रक घेऊन पसार झाला यावरुन अवैध गौण खनिज माफीयाच्या मनात कुठल्याच प्रकारची भिंती नसुन ते राजेरोस पणे अवैध वाहतुक करुन शासनाला लांखो रुपायाचा महसुल बुडंवत असल्याचे सिद्ध होत आहे. तसेच अकोट शहरातुन रोज शेकडो टिपर ओवर लोड गौण खनिज गिट्टी मुरुमाची वाहतुक करत असुन महसुल विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे बनले .जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सी सी कँमेरे व तपासणी नाक्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यानुसार अकोटचे तहसिलदार विश्वनथ घुगे यांनी वेगवेगळी पथके गठीत केली असुन त्याच्या मार्गदर्शनीखाली मडंळ अधिकारी राजेश बोडंखे ,तलाठी प्रविण गिलले,केएस,सोलकर,एम के वाळंके याच्या पथकाने हि कारवाई करुन जप्त असलेले चार ट्रक पणज येथे गा्म पचांयत आवारात लावुन पोलीस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
अधिक वाचा : विद्यार्थी आणि पालकांनी सदैव सतर्क असावे – अकोट शहर ठानेदार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola