अकोट(सारंग कराळे) : आजच्या सामाजिक वातावरणा मुळे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळा मध्ये किशोरवयीन मुलेमुली तसेच तरुण पिढी समाजातील काही असामाजिक तत्वांच्या विळख्यात सापडली असून,पालकांनी आपल्या मुलाकडे जागरूक पणाने लक्ष देण्याची गरज असून ,अश्या मुलांकडून घडलेली एक चूक त्यांचे अवघे जीवन उध्वस्त करण्यास कारणीभूत ठरते असे प्रतिपादन अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके यांनी केले. अकोट शहरातील विद्यार्थी व पालकां साठी अकोट शहर पोलिस्टेशनच्या सावली सभागृहात आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते, ह्या वेळी सावलीसभागृहात पालक, विद्यार्थी आणि नागरिकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. तसेच सभागृहाच्या बाहेर सुद्धा मुलांनी गर्दी केली होती, सध्याच्या काळात पालकांची व शिक्षकांची जबाबदारी खूप वाढली आहे.
मुलांना वाम मार्गाला लावण्या साठी अनेक माध्यमे उपलब्ध आहे, त्या मध्ये लहान मुलांना अगदी सहज उपलब्ध होणारे स्मार्ट मोबाईल फोन, मोबाइल फोन चा जबाबदारीने वापर करण्या एवढी परिपकवता मुलांमध्ये नसल्याने, त्याचा गैरवापर होण्याची शक्यताच जास्त असते, त्यामुळे मुलांना स्मार्ट फोन लहान वयात पालकांनी देऊ नये हे त्यांनी उदाहरण देऊन सांगितले तसेच लहान मुलांना मोटर सायकल, स्कुटर इत्यादी वाहने दिल्यास ते भरधाव वेगाने वाहने चालवून हकनाक स्वतः चा व दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकतात, तसेच घरून पळून जाण्याचे धोके, अल्पवयीन प्रेम प्रकरणाचे दुष्परिणाम असे अनेक विषयांवर १ तासांपेक्षा जास्त मार्गदर्शन करताना, सत्य घटना सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले , सदर मार्गदर्शन मेळावा यशस्वी करण्या साठी फ्रीडम क्लास चे मनोज झाडे , ठाकूर यांच्या सह इतर शिकवणी वर्गाच्या संचालकांनी परिश्रम घेतले. बऱ्याच कालावधी नंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने उपस्थित विद्यार्थी व पालक ह्यांनी समाधान व्यक्त केले.
अधिक वाचा : अज्ञात वाहनाच्या धडकेने युवक जागीच ठार महिला जख्मी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola