अकोला(प्रतिनिधी)- सामाजिक धार्मिक तथा राजकीय चळवळ बाबासाहेबांनंतर टिकवून पुढे नेण्याचे कार्य सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनीच केल. त्यांच्या त्यागामुळेच आज भारतीय बौद्ध महासभे ची वाटचाल यशस्वीरीत्या सुरु आहे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी यांनी केले. तर भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात अनेक अडथळे आले पण कुठल्याही टिके ला न घाबरता चळवळ यशस्वी केली असे आ. बळीराम सिरस्कार यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष प्रदिपभाउ वानखडे यांनी सुद्धा सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा जीवन पाठ सांगुन अभिवादन केले. महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट यानी सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या बालपनाचा खडतर प्रवास विषद केला. भारतीय बौद्ध महासभा व भारिप बहुजन महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मुति दिनानिमित्त आयोजीत अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, दीपक गवई, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ प्रसन्नजीत गवई, श्रीकांत ढगेकर, गौतम शिरसाट, अशोक शिरसाट, संजय बावणे, शामलाल लोध, ॲड संतोष रहाटे, रमेश गवईगुरुजी, पंचशील गजघाटे, राजाभाऊ लबडे, श्रावण ठोसर, प्रशांत शिरसाट, नंदकुमार डोंगरे, आयुष्यमान मेश्राम, पुष्पाताई ईंगळे, रंजनाताई गेडाम, अनुराधाताई ठाकरे, सरलाताई मेश्राम, मंगलाताई शिरसाट, कोकिळाताई वाहुरवाघ, शेगावकर ताई, दामोदर ताई, गावंडे ताई, गजानन गवई, महादेव शिरसाट, विलास जगताप, दीपक बोडखे, शेख साबीर, सुरेश शिरसाट, संजय मुळे, पराग गवई, सुरेंद्रसिंग सोळंके, अशोक नाईक, राहुल अहिरे, प्रदिप पळसपगार, सम्राट तायडे, अंबादास वाकोडे, अंभोरे गुरुजी यांची उपस्थिती होती असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ प्रसन्नजीत गवई यांनी कळविले.