सिरसोली (विनोद सगणे): येथील सिरसोली शेत शिवारात मारपेंड भागातील शेतकरी रामधन कोल्हे यांच्या शेतातील कोरड्या विहिरी मध्ये दोन काळवीट पडले असता कोल्हे यांच्या शेताजवळ असलेल्या शेतकरी अफसर अली,तुळशीराम तायडे, यांना दिसले नंतर वन विभागाला कळविले वन विभागाचे कर्मचारी यांनी पाहिले असता एक काळवीट मेलेले होते. तर दुसऱ्या काळवीटाला विहिरी मधून बाहेर काढून जिवंनदान देण्यात आले यावेळी वन विभागाचे वनरक्षक एस.जी.जोंधळे,कर्मचारी दिपक मेसरे,सोमंत रजाने,कोरडे व गावातील पत्रकार डॉ. संतोष ताकोते,ईरफान अली मिरसाहेब,अहमद शहा ऊर्फ शहंनशाहा,पत्रकार विनोद सगणे, साबीर पठाण काजी साहब,शरद आखरे,ब्रम्हदेव राऊत, संजय अंबुसकर,विवेक काळबांडे,रेहान अली ,साजीद अली,मोहन कोल्हे यांनी सहकार्य केले.