मूर्तीजापुर दि.१७ (प्रकाश श्रीवास)- शाश्वत स्वछतेसाठी केंद्र शासनाच्या पेयजल व स्वछता मंत्रालयाच्या वतीने देशभरात दि.१५ सप्टेंबर ते २ आँकटोबर २०१८ या कालावधीत स्वछता ही सेवा हे विशेष अभियान राबविण्यात येत असुन या अभियानात मूर्तीजापुर शहरातील नागरीकांनी सक्रिय सहभाग घेवुन आपले शहर,शाळा,महाविद्यालय,घराचा आजुबाजुचा परीसर स्वछ ठेवण्याचे आव्हान मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी केले आहे. या अभियानाची सुरुवात नगर परीसरातील वाढलेल्या झाडांची छटाई व संपूर्ण परीसर स्वच्छ करून करण्यात आली.दि.१६ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी ७ वाजता नगर परिषद कार्यालय येथे मुख्याधिकारी विजय लोहकरे, नगराध्यक्षा मोनाली कमलाकर गावंडे, उपनगराध्यक्ष अलिया तब्बसुम नासीरोददीन यांच्या नेतृत्वाखाली स्वछता ही सेवा अभियानास सुरुवात करण्यात आली.
दि.१५ सप्टेंबर ते २ आँकटोबर२०१८ या कालावधीत स्वछता ही सेवा हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. नगर परीषद कार्यालय परीसरातील स्वछता करून अभियानास प्रारंभ करण्यात आला. या शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या स्वछता ही सेवा अभियानात शहरातील नागरीकांनी सहभागी व्हावे असे आव्हान मुख्याधिकारी विजय लोहकरे, नगराध्यक्षा मोनाली कमलाकर गावंडे, उपनगराध्यक्ष अलिया तब्बसुम नासीरोददीन यांनी केले आहे. यावेळी समाजसेवक कमलाकर गावंडे, आरोग्य निरीक्षक विजय लकडे,प्रकल्प प्रमुख राजेश भुगुल, नरसिग चावरे,राजु जवंजाळ, सुनील कुंभेकर, के.डी.खान माजी आरोग्य निरीक्षक, सिरसाट, नितीन शिंगणे,ठाकरे,व नगर परीषद कर्मचारी वर्ग, सफाई कामगार यांची उपस्थित होते.
अधिक वाचा : सर्पमित्रांनी दिले दहा फुटाचे अजगराला जिवनदान
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola