तेल्हारा(प्रतिनिधी)-तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील पाणीपुरवठा पाच दिवसापासुन बंद नागरीकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. बेलखेड ग्राम पंचायतीचे विद्युत कनेक्शन महावितरण कंपनीने कापल्यामुळे पाच दिवसापासून पाणीपुरवठा बंद आहे. गावातील शेकडो नागरीकांचे लक्ष आता सत्ताधारी हाताकडे लागलेले असतांना सामाजिक भावनेतून अॅड श्रीकांत तायडे यांनी शनिवारी दोन वेळा तेल्हारा तहसिलदार डाँ.संतोष येवलीकर यांचे सोबत चर्चा केली.
तहसीलदार यांनी तेल्हारा गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून एक दोन दिवसात मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. सोबतच महावितरणचे अभियंता पवार यांचे सोबत चर्चा करून सामान्य गावकर्यांसाठी मार्ग काढण्याची मागणी अॅड तायडे यांनी केली आहे .गावातील प्रशासनाच्या कृपेने चालनारे अवैद्य नळ कनेक्शनची समस्याही दबक्या आवाजात कारणीभूत आहे असे गावकरी सांगतात.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola