भांबेरी(योगेश नायकवाडे): तेल्हारा,भांबेरी,मनब्दा,चोहट्टा हा अकोला जाण्यासाठी सर्वात जवळीक मार्ग आहे काही दिवसांपूर्वी हा रस्ता पूर्णपणे उखडलेला होता.मात्र आता रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून भांबेरी ते दापूरा फाटा रस्त्याचे काम सुरू झाले आहे.रस्ता उखडलेला असल्याने बंद केलेली बससेवा पुन्हा पुन्हा पुर्वरत करण्याची मागणी येथील ग्रामस्थासह विद्यार्थ्यांनी केली आहे.मागील पाच ते सहा महिन्या पासून खापरखेड,भांबेरी,अटकळी, मनब्दा,दापूरा,पारळा,देवर्डा,टाकळी,परिसरातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ,वृद्ध महिला,जिल्याच्या ठिकाणी रोज ये-जा करतात.भांबेरी ते अकोला मार्गावर खड्यांचे साम्राज्य झाले होते त्यामुळे येथील बससेवा विस्कळीत झाली होती त्याकारनामुळे येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना खाजगी प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.मात्र आता रस्त्याचे काम सुरू झाल्या मूळे येथील बससेवा पूर्वरत करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.
भांबेरी परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने तेल्हारा आणि अकोला शिक्षणासाठी जातात येथील बससेवा बंद असल्याने त्यांना नाईलाजाने खाजगी वाहनाने जावे लागते यामुळे खाजगी वाहनांचे अव्याच्या सव्वा असलेले भाडे परवडणारे नसून त्यामुळे विदयार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे त्यामुळे येथील बससेवा पूर्वरत करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात यावा असे गावकऱ्यांसह प्रहार जनशक्ती पक्षाचे शैलेश नायकवाडे ह्यांची मागणी आहे.
एसटी बससेवा सुरू करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाला पुढील पाऊल उचलावे लागेल.
आशिष उमाळे (अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष शाखा भांबेरी ता.तेल्हारा)
अधिक वाचा :अडगाव बु शेतशिवारात रक्ताच्या थारोड्यात आढळला इसम
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola